Hardik Pandya IPL 2022 SRH vs GT Live Updates : गोलंदाजांची धुलाई होत असतानाही हार्दिक पांड्या बघत राहिला; अभिषेक शर्मा व एडन मार्करामने इंगा दाखवला

IPL 2022 SRH vs GT Live Updates :  मोहम्मद शमी आणि केन विलियम्सन यांच्या लढाईत पुन्हा एकदा गुजरात टायटन्सच्या ( GT) गोलंदाजने बाजी मारली. आयपीएलमध्ये ५ वेळा शमीने विकेट घेत SRHला सुरुवातीला दोन धक्के दिले. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 09:23 PM2022-04-27T21:23:55+5:302022-04-27T21:24:33+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya IPL 2022 SRH vs GT Live Updates: Abhishek Sharma (65), Aiden Markram (56) power Sunrisers Hyderabad to 195/6 against Gujarat Titans | Hardik Pandya IPL 2022 SRH vs GT Live Updates : गोलंदाजांची धुलाई होत असतानाही हार्दिक पांड्या बघत राहिला; अभिषेक शर्मा व एडन मार्करामने इंगा दाखवला

Hardik Pandya IPL 2022 SRH vs GT Live Updates : गोलंदाजांची धुलाई होत असतानाही हार्दिक पांड्या बघत राहिला; अभिषेक शर्मा व एडन मार्करामने इंगा दाखवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : मोहम्मद शमी आणि केन विलियम्सन यांच्या लढाईत पुन्हा एकदा गुजरात टायटन्सच्या ( GT) गोलंदाजने बाजी मारली. आयपीएलमध्ये ५ वेळा शमीने विकेट घेत SRHला सुरुवातीला दोन धक्के दिले. पण, त्याच्या या कामगिरीवर गुजरातच्या अन्य गोलंदाजांनी पाणी फिरवले. अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) व एडन मार्कराम ( Aiden Markram) यांनी संधी साधली अन् हैदराबादला मोठे लक्ष्य उभे करून दिले. अभिषेक व एडन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. गरज पडल्यास गोलंदाजी करेन असे सांगणारा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) गोलंदाजांची धुलाई होत असताना बघ्याच्या भुमिकेत दिसला. 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात प्ले ऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलेले दोन संघ आज वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. गुजरात टायटन्सने ( GT) सातपैकी सहा सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने ( SRH) मागील पाचही सामने जिंकून जबरदस्त कमबॅक केले आहे.  गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात SRHच्या फलंदाजांना बाऊन्सर व भन्नाट वेगाने अचंबित केले. त्यामुळे हैदराबादने सावध सुरुवात करण्यावर भर दिला. पण, शमीने तिसऱ्या षटकात हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन ( ५) याचा त्रिफळा उडवला. 

यंदाच्या पर्वात खास काही करू न शकेलल्या राहुल त्रिपाठीला १ धावांवर राशिद खानने कॅच सोडून जीवदान दिले आणि त्यानंतर पुढील षटकार त्रिपाठीने शमीला झोडपले. ६,४,४ असे फटके मारणाऱ्या त्रिपाठीला सहाव्या चेंडूवर शमीने LBW करून माघारी पाठवले. त्रिपाठी १६ धावा करून बाद झाला. पण, अभिषेक व एडन मार्कराम यांनी गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा घाम काढला. शमीच्या झटक्यानंतर गुजरातच्या अन्य गोलंदाजांकडून तशीच कामगिरी अपेक्षित होती. पण, अल्झारी जोसेफ, राशिद खान, ल्युकी फर्ग्युसन यांना अभिषेक व मार्कराम यांनी झोडले. अभिषेकने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि तेही खणखणीत षटकार खेचून. 


मार्करामनेही खेळाचा वेग हळुहळू वाढवला. फर्ग्युसनला त्याने खेचलेला षटकार लाजवाब होता. माजी संघाने आज राशिद खानची चांगलीच धुलाई केली. राशिदच्या ४  षटकांत SRHने ४५ धावा कुटल्या. राशिदच्या १५ चेंडूंत अभिषेकने ३४ धावा चोपल्या. १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोसेफने गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. अभिषेक ४२ चेंडूंत ६ चौकार  व ३ षटकारांसह ६५ धावांवर त्रिफळाचीत झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सर्वाधिक २८५ धावा या अभिषेकच्या नावावर आहेत. त्यानंतर तिलक वर्मा ( २५०) व राहुल त्रिपाठी ( २२८) यांचा क्रमांक येतो. कर्णधार हार्दिकने पुन्हा शमीला गोलंदाजीला आणले आणि त्याने निकोलस पूरनला ( ३) बाद केले.


मार्करामनेही षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले.  शमीने त्याच्या चार षटकांत ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. यश दयालने टाकलेल्या १८व्या षटकात धावा वाढवण्याच्या प्रयत्नात मार्कराम ५६ धावांवर ( २ चौकार व ३ षटकार) बाद झाला. जोसेफसने १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डायरेक्ट हिट मारून वॉशिंग्ट सूंदरला रन आऊट केले. शशांक सिंगने अखेरच्या षटकात चार षटकार खेचून २५ धावा कुटल्या आणि हैदराबादने ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. शशांक ६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला ( ३ षटकार  व १ चौकार).

Web Title: Hardik Pandya IPL 2022 SRH vs GT Live Updates: Abhishek Sharma (65), Aiden Markram (56) power Sunrisers Hyderabad to 195/6 against Gujarat Titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.