Join us  

हार्दिक पांड्याचे दमदार पुनरागमन; IPL 2024 च्या तयारीसाठी मैदानावर उतरला, २ विकेट्स घेतल्या

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला एक महिना आधी हार्दिक पांड्या मैदानात परतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 1:07 PM

Open in App

Hardik Pandya Returns, IPL 2024 :  इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला एक महिना आधी हार्दिक पांड्या मैदानात परतला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झाल्यानंतर हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. या काळात त्याला बऱ्याच आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकावे लागले. पण, तब्बल चार महिन्यांनंतर त्याचे मैदानात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पांड्या डीवाय पाटील ट्वेंटी-२० स्पर्धेतून मैदानात परतला आणि परतताच त्याने तीन षटकांत दोन विकेट घेतल्या. त्यातील एक विकेट राहुल त्रिपाठीची होती.  

पांड्या या स्पर्धेत रिलायन्स  १ संघाचे नेतृत्व करत आहे आणि भारत पेट्रोलियमविरुद्धच्या सामन्यात त्याने ३ षटकांत २२ धावा देत दोन बळी घेतले. त्याने तिसऱ्याच षटकात दोन्ही विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली होती. त्याच्या घोट्याला दुखापत झाली आणि  त्यानंतर तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. या चार महिन्यांत पांड्याने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आणि अखेर चार महिन्यांत पहिल्यांदाच मैदानात उतरताच खळबळ माजवण्यात त्याला यश आले. भारत पेट्रोलियमचा संघ १८.३ षटकांत १२६ धावांत तंबूत परतला आणि रिलायन्स संघाने ३ षटकांत ४० धावा चोपल्या आहेत.

 हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे . गुजरात टायटन्सना पदार्पणाच्या मोसमात चॅम्पियन बनवणारा पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला.  त्यानंतर आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबईने त्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. रोहित शर्माची जागा पांड्याने घेतली. पांड्या गेल्यानंतर गुजरातने शुभमन गिलला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. 

टॅग्स :हार्दिक पांड्याटी-20 क्रिकेटमुंबई इंडियन्सआयपीएल २०२३