Join us  

Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर

hardik pandya and natasa news : हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 7:03 PM

Open in App

Where Is Hardik Pandya : आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली बॅच रवाना झाली आहे. आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यापूर्वीच भारतीय संघातील शिलेदार अमेरिकेला गेले. पण, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या पहिल्या बॅचमध्ये दिसला नाही. (Hardik Pandya Wife Natasa) हार्दिक सध्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. भारतीय संघ अमेरिकेला जात असल्याची झलक बीसीसीआयने शेअर केली आहे. यात संघाचा उप कर्णधार हार्दिक न दिसल्याने एकच चर्चा रंगली आहे. त्याचा पत्नी नताशासोबत घटस्फोट झाला असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. अशातच हार्दिकबद्दल एक मोठी अपडेट समोर आली. (Natasha Hardik Divorce Reason)

दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी हार्दिक टीम इंडियाच्या पहिल्या बॅचसोबत गेला नाही. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय चाललंय याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक सध्या सुट्टीवर असून तो नंतर टीम इंडियासोबत जोडला जाईल. त्याच्यासोबत पत्नी नताशा स्टँकोव्हिच देखील गेली आहे, असे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. हार्दिक आणि नताशा यांच्यात का रे दुरावा असल्याची चर्चा आहे. मात्र, दोघांनीही याबद्दल भाष्य न करणेच पसंत केले आहे. त्यामुळे हार्दिक आताच्या घडीला नक्की कुठे आहे याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

१ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार स्पर्धेतील पहिला सामना २ जून रोजी खेळवला जाईल, जो अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. टीम इंडिया ५ जूनपासून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. भारत आणि आयर्लंड यांच्यात हा सामना होणार आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरूद्ध खेळवला जाईल.

विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024घटस्फोट