मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे 'हार्दिक' अभिनंदन; पांड्याची घरवापसी, गिलकडे गुजरातचे कर्णधारपद?

आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:54 PM2023-11-25T12:54:20+5:302023-11-25T12:54:45+5:30

whatsapp join usJoin us
 Hardik Pandya is set to leave Gujarat Titans and return to Mumbai Indians in an all-cash deal for ipl next season, read here details | मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे 'हार्दिक' अभिनंदन; पांड्याची घरवापसी, गिलकडे गुजरातचे कर्णधारपद?

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे 'हार्दिक' अभिनंदन; पांड्याची घरवापसी, गिलकडे गुजरातचे कर्णधारपद?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya Rejoin Mumbai Indians IPL 2024 : जगातील सर्वांत लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. खेळाडूंची अदलाबादली सुरू असताना गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची घरवापसी होणार असल्याचे कळते. हार्दिक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसण्याची दाट शक्यता आहे. गुजरातचा संघ गेल्या दोन हंगामापासून आयपीएल खेळत असून हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाने दोन्ही हंगामात अंतिम फेरी गाठली. पदार्पणाच्या हंगामातच किताब पटकावण्याची किमया देखील गुजरातच्या संघाने साधली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या फ्रँचायझीला हार्दिकला मानधन म्हणून आणि गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फी म्हणून १५ कोटी रूपये द्यावे लागतील. हस्तांतरण शुल्काच्या रकमेबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हार्दिकला ट्रान्सफर फीच्या ५० टक्के रक्कम मिळणार आहे. खरं तर हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात २०२२ मध्ये गुजरातचा संघ चॅम्पियन झाला होता. तसेच त्याच्या पुढच्या हंगामात गुजरातला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. अशातच हार्दिक गुजरातची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबई त्याला ट्रेड विंडोद्वारे आपल्या संघात सामील करू इच्छित आहे. गुजरातही हार्दिकला सोडण्याच्या तयारीत आहे. मात्र, मुंबईकडे सध्या निधीची कमतरता असल्याने मोठा पेच निर्माण झाला. २६ तारखेपूर्वी मुंबईच्या फ्रँचायझीला ही रक्कम भरावी लागणार आहे. पण हा करार जवळपास निश्चित झाल्याचे कळते. 

हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसणार आहे. त्यांच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला. आता गुजरातच्या संघाचे व्यवस्थापन आपला नवा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करते हे पाहण्याजोगे असेल. कर्णधारपदाच्या शर्यतीत शुबमन गिल आघाडीवर आहे. त्याचा फिटनेस आणि फॉर्म पाहता त्याच्याकडे कर्णधारपद जाण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय विल्यमसनच्या रूपात गुजरातकडे आणखी एक चांगला पर्याय आहे. 
 

Web Title:  Hardik Pandya is set to leave Gujarat Titans and return to Mumbai Indians in an all-cash deal for ipl next season, read here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.