Hardik Pandya Ishan Kishan Deepak Hooda, IND vs SL T20: हार्दिक पांड्या, इशान किशन आणि दीपक हुडा हे तिघेही सध्या सुरू असलेल्या भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेचा भाग आहेत. सध्याच्या वर्षातील पहिल्या टी२० मालिकेत श्रीलंकेविरुद्ध भारताने पहिली टी२० जिंकली. हार्दिक पांड्या या संघाचा कर्णधार आहे. भारताने श्रीलंकेविरूद्ध पहिला टी२० सामना जिंकला. त्यात या तीन खेळाडूंची भूमिका महत्त्वाची बजावली. आता दुसऱ्या सामना आज रंगणार आहे. पण त्याआधी भारताच्या तीन महत्त्वाच्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसीने ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत काही खेळाडूंना क्रमवारीत बढती मिळाली आहे.
इशान किशनला बढती
ICC च्या ताज्या क्रमावारीत या खेळाडूंना बक्षीस म्हणून क्रमवारीत बढती मिळाली आहे. भारताच्या या तिन्ही खेळाडूंनी ताज्या टी२० क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे. भारताचा सलामीवीर इशान किशनने नवीन टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत १० स्थानांनी झेप घेत २३व्या स्थानावर झेप घेतली. ३७ धावांची उपयुक्त खेळ करणाऱ्या इशान किशनलाही नव्या क्रमवारीत फायदा झाला. पहिल्या टी२० सामन्यात अपयशी ठरल्यानंतरही सूर्यकुमार यादवने अव्वल स्थान कायम राखले.
सामनावीर दीपक हुड्डाचाही फायदा
श्रीलंकेविरुद्धचा पहिल्या टी२० सामन्यात दीपक हुड्डाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. दीपक हुड्डा ताज्या क्रमावारीत टॉप १००मध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात त्याने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या होत्या. त्या खेळीच्या जोरावर ICC रँकिंगमध्ये तो पुढे आला असून तो आता ९७व्या स्थानावर आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत हार्दिक पांड्याने घेतली झेप
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिकने १३ चेंडू निर्धाव टाकले. त्याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर हार्दिक पांड्यालाही नव्या क्रमवारीत फायदा झाला आहे. भारतीय कर्णधाराच्या क्रमवारीत ९ स्थानांची सुधारणा झाली असून तो आता गोलंदाजांच्या क्रमवारीत ७६ व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात एक विकेट घेऊन अव्वल गोलंदाज ठरला. त्याचबरोबर हसरंगा आता अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.
Web Title: Hardik Pandya Ishan Kishan Deepak Hooda rises up in ICC T20 Rankings after IND vs SL 1st T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.