सुनील गावसकर लिहितात...
भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेली लढत ‘कसोटी’ संबोधण्याच्या लायक आहे, असे वाटत नाही. पहिल्या डावात ३८ षटकेही खेळणे शक्य नसलेल्या संघाचा आंतरराष्ट्रीय संघ असा उल्लेख करावा लागतो. पाटा खेळपट्टीवर श्रीलंका संघ दुसºया डावात किती धावा काढतो, याला विशेष अर्थ नाही. श्रीलंका संघाने लढवय्या वृत्ती दाखविलेली नाही. श्रीलंका संघाची सुमार कामगिरी बघितल्यानंतर या लढतीचा कसोटी असा उल्लेख करताना अडखळल्यासारखे वाटते.
दुसºया कसोटी सामन्यात दुसºया डावात श्रीलंका संघाची फलंदाजी बघितल्यानंतर त्यांची फलंदाजीची बाजू कमकुवत आहे, असा उल्लेख करताना मी चूक करीत असल्याचे वाटते. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असताना पहिल्या डावात श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. यासाठी फलंदाजीच्या तंत्रापेक्षा श्रीलंकेच्या फलंदाजांचे टेम्परामेंट अधिक कारणीभूत आहे. त्यांची गोलंदाजीही प्लेट रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या लायकीची नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खोºयाने धावा वसूल करता येतात. शिखर धवनने आणखी एक शतक झळकावत निवड समिती सदस्यांसाठी सुसह्य डोकेदुखी निर्माण केली आहे. मायदेशात खेळल्या जाणाºया कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून कुणाची निवड करायची, हा प्रश्न निवड समिती सदस्यांना डोक्याला त्रास देणारा ठरणार आहे. हार्दिक पांड्याने शानदार शतकी खेळी केली. त्याने ज्या सहजतेने हे शतक झळकावले त्यानंतर त्याला कसोटी क्रिकेट काही कठीण नाही, असे वाटू शकते. त्याला लंकेच्या गोलंदाजांकडून विशेष आव्हान मिळाले नाही. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलला नेतृत्वामध्ये कल्पकता दाखविता आली नाही. अर्धशतक साकारल्यानंतर आणि त्याची साथ देण्यासाठी अखेरचा फलंदाज उमेश खेळपट्टीवर आल्यानंतर हार्दिकने आक्रमक पवित्रा स्वीकारला. कर्णधार कोहलीला वाटले की त्याचा दिवस असून त्यानेही यापूर्वीच्या कसोटीच्या तुलनेत या वेळी हार्दिकला लवकरच गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना मॅथ्यूजला भोपळा फोडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविला. लंकेच्या पहिल्या डावाच्या अखेर त्याने झेल टिपत आजचा दिवस त्याच्यासाठी परफेक्ट क्रिकेट दिन असल्याचे सिद्ध केले. रवींद्र जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे संधी मिळालेल्या युवा कुलदीपने ४ बळी घेत स्वत:ची निवड सार्थ ठरविली. त्याच्या गोलंदाजीवर चौकार ठोकले जात असतानाही त्याने चेंडूला उंची देण्याचे धाडस दाखविले, ही बाब उल्लेखनीय आहे. २ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारताला लंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या वेळी मात्र भारतीय चाहते श्रीलंकेला क्लीन स्वीप दिल्याच्या आनंदासह स्वातंत्र्यदिन साजरा करतील. (पीएमजी)
Web Title: Hardik Pandya, Kuldeep Yadav left the mark
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.