IPL 2021, Hardik Pandya : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. सलग तिसऱ्या जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरलाही दोन धक्के सहन करावे लागले. आता हे उभय संघ रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवणे गरजेचा आहे. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडू मैदानावर उतरवून बाजी मारण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) या सामन्यासाठी खास रणनीती आखली आहे आणि हार्दिक पांड्याबाबतही मोठे अपडेट्स दिले आहेत.
ICCचा टॉप गोलंदाज राजस्थाननं मैदानावर उतरवला, दिल्लीची कोंडी करण्याचा निर्धार केला
मुंबई इंडियन्सनं ( MI) ९ सामन्यांत ८ गुणांसह सहावे स्थान पटकावले आहे, तर RCB ९ सामन्यांत १० गुणांसह तिसऱ्य़ा क्रमांकावर आहे. पाठिच्या दुखण्यामुळे हार्दिक पांड्या दोन सामन्यात खेळलेला नाही आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो तंदुरूस्त रहावा, यासाठी त्याला विश्रांती दिली जात असल्याचे फ्रँचायझीकडून सांगण्यात येत आहे. त्यात टीम व्यवस्थापक झहीर खान यानंही मोठे अपडेट्स दिले. हार्दिकनं सरावाला सुरुवात केली असून उद्याच्या सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा आहे, असे मत झहीरनं व्यक्त केलं. हार्दिक खेळल्यास RCBची डोकेदुखी नक्की वाढेल.