Join us  

Hardik Pandya, IPL 2022: नव्या टेबल टॉपर्सचे 'हार्दिक' स्वागत! राजस्थानला नमवून गुजरात गुणतालिकेत अव्वल!!

हार्दिक पांड्याच्या ८७ धावा; लॉकी फर्ग्युसन, यश दयालचे ३-३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:38 PM

Open in App

Hardik Pandya, IPL 2022 RR vs GT Live Updates: राजस्थान विरूद्धच्या सामन्यात गुजरातने ३७ धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या 'कॅप्टन इनिंग्ज'मुळे गुजरातने १९२ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात जोस बटलरने ५४ धावांची खेळी केली. पण लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल यांच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्याआधी ६ गुणांसह राजस्थान अव्वलस्थानी होते. पण गुजरात विजयासह ८ गुण मिळवत गुणतालिकेत पहिला नंबर पटकावला. 

--

१९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्त पडिकल शून्यावर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर अश्विनला (८) बढती मिळाली पण त्याचा फायदा झाला नाही. जोस बटलरने मात्र तुफानी अर्धशतक केले. त्याने २४ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच्या खेळीला लॉकी फर्ग्युसनने ब्रेक लावला. मधल्या फळीतील संजू सॅमसन (११), वॅन डर डुसेन (६), रियान पराग (१८), नीशम (१७) हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. शिमरॉन हेटमायरने १७ चेंडूत २९ धावांची झुंज दिली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे राजस्थानला ३७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

--

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरातच्या सलामीवीरांना फारशी चमक दाखवता आली नाही. मॅथ्यू वेड १२ धावांवर रन आऊट झाला. विजय शंकर २ धावा काढून तर शुबमन गिल १३ धावा काढून झेलबाद झाला. पण त्यानंतर हार्दिक पांड्याने आधी अभिनव मनोहर आणि नंतर डेव्हिड मिलरच्या साथीने संघाला १९२ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने नाबाद ८७ धावांची खेळी केली. तर अभिनव मनोहरने ४३ आणि डेव्हिड मिलरने नाबाद ३१ धावा काढत त्याला चांगली साथ दिली.

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यागुजरात टायटन्सजोस बटलर
Open in App