Join us  

Hardik Pandya loses his cool, IPL 2022 : चोराच्या उलट्या बोंबा!; हार्दिक पांड्याचा संयम सुटला सहकारी फलंदाजाला Live Match मध्ये नको ते बोलला, Video  

Hardik Pandya loses his cool, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कर्णधार म्हणून पदार्पणात हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करून दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 4:48 PM

Open in App

Hardik Pandya loses his cool, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कर्णधार म्हणून पदार्पणात हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएल २०२२त आतापर्यंत अपराजित राहिलेला एकमेव संघाचा मान गुजरात टायटन्सने पटकावला आहे.  गुजरातने शुक्रवारी पंजाब किंग्सवर रोमहर्षक विजयाची नोंद करताना हॅटट्रिक साजरी केली आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पण, या सामन्यात कर्णधार हार्दिक सहकारी फलंदाज डेव्हिड मिलरवर ( David Miller) भडकलेला दिसला अन् लाईव्ह मॅचमध्ये त्याच्यावर खेकसला. त्याच्या या गैरकृताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला १८ चेंडूंत ३७ धावांची गरज होती. अर्षदीपने १८व्या षटकात केवळ ५ धावा दिल्या. १९व्या षटकात रबाडाने चार चेंडूंत ११ धावा दिल्याने पंजाब तणावाखाली गेले, परंतु पाचव्या चेंडूवर चतुराईने त्याने शुबमन गिलला बाद केले. गुजरातला ६ चेंडूंत १९ धावांची गरज होती. ओडिन स्मिथने wide चेंडूने २०व्या षटकाची सुरूवात केली. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर डेव्हिड मिलर फटका मारण्यापासून चुकला आणि चेंडू यष्टिरक्षक बेअरस्टोच्या हाती असताना नॉन स्ट्रायकर एंडवरून हार्दिक धाव घेण्यासाठी पळाला. पण, बेअरस्टोने त्याला ( २७) धावबाद केले. यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू असतानाही हार्दिक धाव घेण्यासाठी पळाला अन् बाद होताच त्याने मिलरवर राग काढला.      

पाहा व्हिडीओ...  लाएम लिव्हिंगस्टोन ( ६४), शिखर धवन ( ३५), जितेश शर्मा ( २३) व राहुल चहर ( २२*) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने ९ बाद ८९ धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत टिच्चून मारा केला. त्यांनी केवळ ३७ धावा देताना चार विकेट्स या पाच षटकांत काढल्या. पदार्पणवीर दर्शन नळकांडेने सलग दोन विकेट्स घेतल्या, तर राशिद खानने २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात शुबमन गिलने ९६ धावांची खेळी केली. सुदर्शनने ( ३५) दुसऱ्या विकेटसाठी गिलसोबत ६८ चेंडूंत १०१ धावांची भागीदारी केली.  २ चेंडूंत १२ धावा हव्या असताना राहुल तेवातियाने दोन खणखणीत षटकार खेचले व गुजरातने ६ विकेट्स राखून विजय मिळवला.  

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यागुजरात टायटन्सपंजाब किंग्स
Open in App