इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या पर्वासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे आणि तेही नवा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली. ज्या फ्रँचायझीकडून कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांच्यासाठी पुन्हा खेळण्यासाठी हार्दिक उत्सुक आहे. ''मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतल्याचा आनंद आहे. २०१५ मध्ये याच संघातून माझा प्रवास सुरु झाला होता आणि त्याने माझे आयुष्य बदलले. हा प्रवास स्वप्न पूर्ण करणारा होता आणि यापुढेही नव्या भूमिकेत आपले १००% देण्याचा प्रयत्न आहे,''असे तो म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की,''आता कर्णधार म्हणून संघात परतल्याचे नक्कीच थोडे दडपण आहे. आधी रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेलो आणि आता रोहित माझ्या नेतृत्वाखाली खेळेल, याने फार काही बदलणार आहे असे मला वाटत नाही. त्याने मला खूप मदत केली आहे आणि आताही जेव्हा मला गरज असेल तेव्हा तो उभा राहील. त्याने या फ्रॅंचायझीसाठी खूप काही अचिव्ह केले आहे त्याचा हे यश पुढेही कायम राखण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचा हात माझ्या खांद्यावर नेहमी असेल.''
''या पर्वात मी गोलंदाजी करणार आहे.. मला कर्णधार केल्याने MI चे चाहते नाराज झाले असतील तर त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. त्यांच्या रागावर मला नियंत्रण ठेवता येणार नाही, परंतु मी मैदानावर कशी कामगिरी करायची यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे,'' रोहितला कॅप्टनम्हणून हटवल्यानंतर चाहत्यांचा रोष पत्करावा लागल्याच्या प्रश्नावर हार्दिकने त्याचे मत मांडले.
रोहित शी बोलणं झालंय का? MI ने निर्णय घेतल्यानंतर रोहित सोबत बोलणं झालय का? यावर हार्दिक म्हणाला, हो पण आणि नाही पण.. रोहित टीम इंडियासोबत सातत्याने दौरे करतोय आणि मी पण तंदुरुस्ती वर मेहनत घेत होतो. त्यामुळे दोघेही बिझी होतो. अजून तरी फ्रॅंचायझीच्या निर्णयानंतर रोहित शी बोलणं झालेलं नाही.
मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद
मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक
- २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
- २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
- १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
- ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई