हार्दिक पांड्या हा आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू आहे. आंततराष्ट्रीय टी-२० क्रिकेट आणि आयपीएलमध्येही पांड्याची एक वेगळीच हवा दिसून येते. त्यात आता आणखी एका खास रेकॉर्डची भर पडली आहे. हार्दिक पांड्यानं आता टीम इंडियातील स्टायलिश मॅच फिनिशरच्या रुपात आपली छाप सोडलीये. पांड्याचा स्वॅग आणि सिक्सर मारत मॅच जिंकून देण्याचा अंदाज एकदम खास आणि झक्कास असतो. एवढेच नाही तर या शैलीतील कामगिरीनं एक नवा रेकॉर्डही त्याच्या नावे झाला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताला सर्वाधिक वेळा सिक्सर मारून मॅच फिनिश करून देण्याचा खास रेकॉर्ड या ऑल राउंडरच्या नावे झाला आहे.
धोनी, विराट विसरा, इथं हार्दिक पांड्या आहे टॉपर
महेंद्रसिंह धोनी हा सिक्सर मारून मॅच फिनिश करण्यात माहिर होता, ही गोष्ट प्रत्येकालाच माहिती आहे. पण या दिग्गजाला विराट कोहलीनं मागे टाकले होते. आता विराट कोहलीला मागेट टाकत पांड्या याबाबतीत नंबर वन झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याने सिक्सर मारत मॅच संपवली. यासह त्याने विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला आहे.
टी-२०तील स्टायलिश फिनिशरच्या यादीत पंतचीही लागते वर्णी
विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ४ वेळा सिक्सर मारून मॅच संववल्याचे पाहायला मिळाले होते. धोनीनं हा पराक्रम तीन वेळा केला होता. या दोघांना मागे टाकत हार्दिक पांड्यानं नवा विक्रम सेट केला आहे. तो सिक्सरसह मॅच फिनिशर करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत टॉपला पोहचला आहे. आतापर्यंत ५ वेळा हार्दिक पांड्यानं आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारतीय संघाचा विजय सुनिश्चित करताना सिक्सर मारला आहे. या यादीत रिषभ पंत चौथ्या स्थानावर आहे. धोनीप्रमाणेच त्याने ३ वेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे.
अगदी स्टायलिश अंदाजात खेळताना दिसला हार्दिक पांड्या
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिक पांड्यानं बांगलादेश विरुद्धच्या ग्वाल्हेर टी-२० सामन्यातून कमबॅक केले. गोलंदाजीमध्ये त्याने एक विकेटही घेतली. ज्यावेळी बॅटिंगचा नंबर आला त्यावेळी त्याने अगदी स्टायलिश अंदाजात फटकेबाजी केली. नो लूक शॉट मारल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव त्याचा स्वॅग दाखवून देणारे होते. टीम इंडियाला विजयासाठी २ धावांची गरज असताना त्याने उत्तुंग षटकार मारून सामना संपवला.