न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या संघात, पृथ्वी शॉ याचेही कमबॅक

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 10:02 AM2019-12-24T10:02:22+5:302019-12-24T10:02:50+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya, Prithvi Shaw to tour New Zealand with India A | न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या संघात, पृथ्वी शॉ याचेही कमबॅक

न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या संघात, पृथ्वी शॉ याचेही कमबॅक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवनची ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत वापसी झाली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही. या दोन मालिकांनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी भारत अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं संघ जाहीर केला. त्यात हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ यांना संधी देण्यात आली आहे. 

भारत अ संघ जानेवारी 2020मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं संघ जाहीर केला. या दौऱ्यातील वन डे सामन्यांसाठीच हार्दिकची निवड करण्यात आली आहे, तर पृथ्वी वन डे आणि चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेतून हार्दिक व पृथ्वी पुन्हा टीम इंडियात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणार आहेत.  या दोघांसह शुभमन गिलचाही या संघात समावेश आहे. वन डे मालिकेसाठी निवडलेल्या भारत अ संघाचे नेतृत्व गिल सांभाळणार आहे, तर चार दिवसीय सामन्यांसाठी भारत अ हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली खेळेल.


भारतीय कसोटी संघाचे सदस्या मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि वृद्धीमान साहा या मालिकेतील दुसऱ्या चार दिवसीय सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि ऑक्टोबरमध्ये सर्जरीसाठी तो लंडनला गेला होता. त्यानंतर त्यानं तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेतली आहे. 
 

भारत अ संघ ( तीन वन डे साठी आणि दोन दौऱ्यावरील सामन्यांसाठी ) - पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन ( यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, अक्षर पटेल, राहुल चहर, संदीप वॉरियर, इशांन पोरेल, खलील अहमदस मोहम्मद सिराज 

भारत अ ( पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी)- पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू इस्वरन, शुबमन गिल, हनुमा विहारी ( कर्णधार), केएस भारत ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, शाहबाझ नदीम, राहुल चहर, संदीप वॉरियर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान पोरेल, इशान किशन

भारत अ ( दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी) - पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), हनुमा विहारी ( कर्णधार), केएस भारत, शिवम दुबे, आर अश्विन, शाहबाज नदीम, संदीप वॉरियर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान पोरेल.

असा असेल दौरा 
पहिली टुअर मॅच - 17 जानेवारी
दुसरी टुअर मॅच - 19 जानेवारी  
पहिली वन डे - 22 जानेवारी 
दुसरी वन डे - 24 जानेवारी
तिसरी वन डे - 26 जानेवारी
पहिला चार दिवसीय सामना - 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 
दुसरा चार दिवसीय सामना - 7 ते 10 फेब्रुवारी 

Web Title: Hardik Pandya, Prithvi Shaw to tour New Zealand with India A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.