Hardik Pandya Maldives Controversy: मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांवरून वाद चिघळला असून विविक्ष क्षेत्रातील दिग्गजांनी याविरोधात आवाज उठवला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांबद्दल अपमानजक भाषा वापरल्यामुळे मालदीव सरकारमधील मंत्र्यांचा निषेध केला जात आहे. वादग्रस्त विधानांमुळे मालदीव दिवसभर चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांसह क्रीडा विश्वातील दिग्गजांनी मालदीवमधील प्रमुख व्यक्तींच्या विधानाविरोधात आवाज उठवला. अशातच भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "भारताबद्दल जे काही बोलले जात आहे ते पाहून खूप वाईट वाटले. सुंदर सागरी जीवन, सुंदर समुद्रकिनारे, लक्षद्वीप हे एक पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे... मला वाटते की, मी माझ्या पुढच्या सुट्टीसाठी नक्कीच इथे भेट दिली पाहिजे. #ExploreIncredibleIndia." एकूणच भारतीय पर्यटनाला पाठिंबा देण्यासाठी देशातीलच पर्यटन स्थळांना भेट द्यायला हवी असे पांड्याने म्हटले आहे.
मालदीव सरकारची मोठी कारवाई
वाद चिघळल्याने मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना यांना निलंबित केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारने रविवारी आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान अशी तीन निलंबित मंत्र्यांची नावे आहेत. लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याच्या विरोधात त्यांच्या अपमानास्पद आणि वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल भारतीय आणि पंतप्रधान मोदी यांच्या टीकेच्या दरम्यान तीन मंत्र्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मालदीव विरोधात आवाज उठवल्यानंतर मालदीव सरकारने हे पाऊल उचलले.
दरम्यान, मालदीवच्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांसंदर्भाने घाणेरडी कमेंट केली अन् वाद चिघळला. प्रोग्रेसिव्ह पक्षाचे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडविली. जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या मालदीव भेटीचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. 'चांगले पाऊल. मात्र, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? सर्वात मोठी समस्या खोल्यांमधील वास असेल, असे रमीझ यांनी म्हटले.
Web Title: Hardik Pandya said that I will do my next Holiday Plan in Lakshadweep for Maldives Controversy Explore Incredible India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.