मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगने टीम इंडियाला अनेक युवा स्टार खेळाडू दिले... भारताच्या सध्याच्या मर्यादित षटकांच्या संघाचा विचार केल्या, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या ही नावं आघाडीवर आहेत. या तिघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. बुमराह तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज बनला आहे. हार्दिकनं गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. याच हार्दिकनं शुक्रवारी सोशल मीडियावर स्वतःचा जूना फोटो शेअर केला. भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या हार्दिकचा हा फोटो पाहून त्याला ओळखण फार कठीण होत आहे. पण, हाच फोटो त्याचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास स्पष्ट करून जातो.
क्रिकेट शिकण्यासाठीचा हार्दिकचा प्रवास या फोटोतून दिसत आहे. हार्दिक त्यावेळी स्थानिक सामना खेळण्यासाठी चक्क ट्रकमधून प्रवास करायचा आणि आज त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत.
हार्दिक पांड्याचे बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रॅम्प वॉक, कोण आहे ती?
हार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो
बाबाss लगीन... हार्दिक पांड्याची पुन्हा 'विकेट'; बॉलिवूड नायिकेनंच केलं 'बोल्ड'
हार्दिकनं आतापर्यंत 11 कसोट सामन्यांत 532 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत. वन डेत त्याच्या नावावर 54 सामन्यांत 957 धावा आणि 54 विकेट्स आहेत, तर ट्वेंटी-20 39 सामन्यांत 296 धावा आमि 37 विकेट्स आहेत.
या फोटोतील चिमुकला आहे जगातील सर्वोत्तम खेळाडू, ओळखा पाहू तो कोण?
मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. पण, हा फोटो नेमका कोणाचा आहे, हे ओळखणं कठीण होत आहे. भल्याभल्या क्रिकेट तज्ञांनाही हा मुलगा कोण आहे, यासाठी डोकं खाजवावं लागत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही विचार करत बसला असाल. चला तुम्हाला आम्ही एक हिंट देतो, हा लहान मुलाचा फोटो जगातील सर्वोत्तम खेळाडूंत अव्वल स्थानावर असलेल्या मुलाचा आहे. ज्याच्या तालावर दिग्गज फलंदाज नाचतात, गोलंदाजीच्या त्याच्या हटके शैलीनं जगाला वेड लावलं आहे, आताचा युवा खेळाडू त्याच्या शैलीची कॉपी करत आहे, त्याचा यॉर्कर म्हणजे यष्टिंचा वेध घेणाराच... अजून नाही कळलं कोण आहे हा? चला तर मग आता सांगून टाकतो... भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा लहानपणीचा हा फोटो आहे.
Web Title: Hardik Pandya shares a throwback picture to show his amazing cricket journey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.