दुखापतीमुळे बराचवेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पांड्यानं मंगळवारी डी. वाय पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत वादळी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिकनं तुफानी फटकेबाजी करून टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. हार्दिकने 37 चेंडूंत शतक झळकावले. इतकेच नाही तर त्यानं गोलंदाजीतही कमाल दाखवताना प्रतिस्पर्धींचे पाच फलंदाज तंबूत पाठवले आणि संघाला 101 धावांनी विजय मिळवून दिला.
Breaking: BCCIची कॉस्ट-कटिंग; IPL 2020तील विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत कपात
रिलायन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हार्दिकनं 39 चेंडूंत 105 धावा कुटल्या. त्याने 8 चौकार व 10 षटकारांची आतषबाजी केली. त्याला अनमोलप्रीत सिंग ( 88) आणि सौरभ तिवारी ( 26) यांनी तुल्यबळ साथ दिली. रिलायन्सने हार्दिकच्या फटकेबाजीच्या जोरावर CAG संघाविरुद्ध 20 षटकांत 5 बाद 252 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात CAG संघाला 17.2 षटकांत सर्वबाद 151 धावांवर समाधान मानावे लागले. हार्दिकने 26 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. अनुकूल रॉय ( 2/13) आणि प्रिन्स बलवंत राय ( 2/30) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या कंबरेच्या दुखापतीमुळे त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रियाही झाली होती. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो मैदानावर परतला. न्यूझीलंड दौऱ्यातील ट्वेंटी-20 व वन डे मालिकेतून तो पुनरागमन करणार, अशी शक्यता होती. पण, तो स्वतःच्या तंदुरुस्तीवर समाधानी नव्हता आणि म्हणून त्यानं दौऱ्यातून माघार घेतली होती.
हार्दिक म्हणाला,''माझ्यासारख्या खेळाडूसाठी हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. मी जवळपास सहा महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलो आहे. हा माझा दुसराच सामना आहे. त्यामुळे स्वतःची तंदुरुस्ती तपासण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे.'' या खेळीनंतर आपण पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचा विश्वासही हार्दिकनं व्यक्त केला आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमनाचे संकेत दिले.
'मिताली'नंतर शेफाली! आयसीसीच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान
Video : धोनीला पाहताच गळ्यात पडला सुरेश रैना, मानेवर केलं Kiss