Join us  

Hardik Pandya Yuvraj Singh, IPL 2022 RR vs GT Live: 'कुंफू पांड्या'च्या खेळीला युवराजचा सलाम! वासिम जाफरनेही पोस्ट केला खास फोटो

आता हार्दिककडे टीम इंडियाचे सिलेक्टर्स दुर्लक्ष करून शकत नाहीत, नेटकऱ्यांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:00 PM

Open in App

Hardik Pandya at 4, IPL 2022 RR vs GT Live: राजस्थान विरूद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकात १९२ धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी करत ५२ चेंडूत नाबाद ८७ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीला युवराज सिंग, वासिम जाफर यांच्या नेटकऱ्यांनीही सलाम केला. टीम इंडियाची निवड समिती आता हार्दिक पांड्याकडे दुर्लक्ष करूच शकत नाही, असा सूर सोशल मीडियावर दिसून आला.

युवराज सिंगने हार्दिक पांड्याच्या खेळीची स्तुती करत असताना, तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बनू शकतो अशी भविष्यवाणी केली. हार्दिककडे फलंदाजीचे चांगले तंत्र असल्यामुळे तो नक्कीच चोख कामगिरी बजावेल, असे युवराज म्हणाला. वासिम जाफरने देखील एक फोटो ट्वीट केला. टीम इंडियातील पझलचा एक तुकडा सापडत नव्हता. पण अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या रूपाने आता तो तुकडा सापडला, असा संदेश त्याने ट्वीटमधून दिला. याशिवाय नेटकऱ्यांनीदेखील हार्दिकच्या खेळीचे मनसोक्त कौतुक केले.

--

--

--

--

--

दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने कर्णधार पदाला साजेशी खेळी केलीच. पण त्याला अभिनव मनोहर (४३) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ३१) यांची उत्तम साथ मिळाली. अभिनव मनोबरने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. तर डेव्हिड मिलरने एका षटकात २१ धावांची फटकेबाजी करत ५ चौकार आणि एक षटकार लगावला.

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यायुवराज सिंगवासिम जाफर
Open in App