मुंबई, दि. 17 - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौ-यात दमदार प्रदर्शन केल्याने हार्दिक भलताच खूष आहे. आपल्या यशाचं श्रेय त्याने वडिलांना दिलं आहे. पल्लेकल कसोटीत मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या पांड्याने कसोटी मालिका संपल्यानंतर आपल्या वडिलांचे आभार मानले आणि त्यांना एक सरप्राइज गिफ्ट दिलं.हार्दिकने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्याचे वडिल एका कार शो-रूमजवळ आहेत. तेथे त्यांच्यासमोर एक लाल रंगाची चमकती कार उभी आहे. त्यांना काहीही कल्पना नव्हती की ही कार त्यांच्यासाठी आहे. तेथे असलेल्या शोरूमच्या कर्मचा-यांनी त्यांना आपण या कारचे मालक आहेत असं सांगितल्यावर ते चांगलेच हैराण झाले. त्यांना विश्वास बसत नव्हता पण हार्दिकने त्यांना सरप्राइज गिफ्ट दिल्याचं सांगितल्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर हार्दिकसोबत व्हिडीओ चॅटिंग करताना ते भावनिक झाले.
(3/4) Only for our careers and I can't thank him enough for all he has done.
(4/4) family is life and special mention to my brother @vibsnasir for getting this done when I was not around 😘
(1/4) So glad to see his face lit up like that❤ Yes this is the guy who should get all the happiness in life & deserves the credit, my dad!
— hardik pandya (@hardikpandya7) August 16, 2017आणखी वाचा - (रनआउट झाल्यावर जडेजाचा राग आला होता पण...हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया)
हार्दिक पांड्या भविष्यातला कपिल देव, मुख्य निवडकर्त्यांनी उधळली स्तुतीसुमनं-
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची बॅट चांगलीच तळपली. याशिवाय एक गडी बाद करून त्याने आपली गोलंदाजीतली चमकही दाखवली. या सामन्यात त्याने अनेक विक्रमही मोडित काढले. तुफानी फटकेबाजी करत या सामन्यात हार्दिकने कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक फटकावलं. हार्दिक पांड्याने 96 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांसह फटकावलेल्या 108 धावांमुळे भारताने पहिल्या डावात 487 धावा ठोकल्या. या धमाकेदार खेळीमध्ये पांड्याने एका षटकात तब्बल 26 धावा कुटल्या. यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एका षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्याच्या या धमाकेदार खेळीचं भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी कौतूक केलं आहे. पांड्यावर स्तुतीसुमनं उधळताना त्याच्या भविष्यातला कपिल देव बनण्याची क्षमता असल्याचं प्रसाद म्हणाले. जर पांड्या असाच खेळत राहीला आणि त्याने स्वतःवर ताबा ठेवला तर भविष्यातला कपिल देव बनण्यापासून त्याला कोणीच रोखू शकत नाही, असं प्रसाद म्हणाले. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे. पांड्याने मिळालेल्या संधीचं सोनं कोलंय. त्याने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात आपली उपयोगता आधीच सिद्ध केली होती, आता कसोटी क्रिकेटमध्येही त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. अनेक वर्षांपासून अष्टपैलू खेळाडू शोधण्याचा भारताचा प्रयत्न सुरू होता, पांड्याला पाहून भारताचा हा शोध थांबला असं वाटतं. जर पांड्या असाच खेळत राहीला आणि त्याने स्वतःवर ताबा ठेवला तर भविष्यातला कपिल देव बनण्यापासून त्याला कोणीच रोखू शकत नाही, असं प्रसाद म्हणाले.
पांड्याने एका ओव्हरमध्ये रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटमध्ये एकाही भारतीयाला जमला नाही हा रेकॉर्ड-
केवळ तिसरा कसोटी सामना खेळणा-या हार्दिक पांड्याने पल्लेकल कसोटीत एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावावर केला आहे. तुफानी फटकेबाजी करत या सामन्यात हार्दिकने कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक फटकावलं. हार्दिक पांड्याने 96 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांसह फटकावलेल्या 108 धावांमुळे भारताने पहिल्या डावात 487 धावा ठोकल्या. या धमाकेदार खेळीमध्ये पांड्याने एका षटकात तब्बल 26 धावा कुटल्या. यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एका षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. श्रीलंकेचा लेफ्ट आर्म स्पिनर मिलिंदा पुष्पकुमाराच्या ओव्हरमध्ये त्याने सलग तीन षटकार आणि दोन चौकार (4, 4, 6, 6, 6, 0) फटकावले. या खेळीमुळे पांड्याने महान खेळाडू कपिल देवचा विक्रम मोडला. कपिलने 1990 मध्ये एकाच ओव्हरमध्ये 24 धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडचा स्पिनर एडी हेमिंग्स याच्या षटकात कपिलने लागोपाठ चार षटकार (0, 0, 6, 6, 6, 6) लगावले होते. भारतीय संघाने आज खेळायला सुरुवात केल्यावर वृद्धिमान साहा आणि हार्दिक पांड्याने संयमी सुरुवात केली. मात्र सावध खेळत असलेला साहा 16 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पांड्याने कुलदीप यादवसोबत (26) 61 धावांची भागीदारी करत संघाला चारशेपार मजल मारून दिली. कुलदीप बाद झाल्यावर पांड्याने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला. यादरम्यान, त्याने मालिंदा पुष्पकुमाराच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांसह 26 धावा वसूल केल्या. पांड्याने त्यानंतरही लंकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवत अवघ्या 86 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कालच्या 6 बाद 329 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने आज उपाहारापर्यंतच्या खेळात आपल्या धावसंख्येत 158 धावांची भर घातली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 9 बाद 487 धावा झाल्या होत्या. मात्र उपाहारानंतर भारताचा डाव लांबला नाही. पांड्याला 108 धावांवर बाद करत लक्षण सँडकनने भारताचा डाव 487 धावांवर संपु्ष्टात आणला. सँडकनने पाच बळी टिपले. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे सहावे कसोटी शतक आणि त्याने लोकेश राहुलसोबत सलामीला केलेल्या १८८ धावांच्या भागीदारीनंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे यजमान श्रीलंकेने भारताला पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३२९ धावांत रोखले.