Hardik Pandya Injury Updates : भारतीय संघ इंग्लंडचा सामना करण्यासाठी आज लखनौमध्ये दाखल झाला आहे. पण, त्यांना मोठा धक्का पोहोचवणारी बातमी समोर आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत दुखापत झालेल्या हार्दिक पांड्याचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर पडले आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीला मुकावे लागले होते आणि तो इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, PTI ने दिलेल्या वृत्तानुसार तो इंग्लंडच्याच नव्हे, तर पुढच्या सामन्यालाही मुकणार आहे.
पुण्यात बांगालदेशविरुद्धच्या लढतीत पांड्याचा पाय मुरगळला होता आणि त्यानंतर त्याने मैदान सोडले. तो नंतर खेळायला आलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी बंगळुरू येथील NCA मध्ये उपचारासाठी गेला. त्यामुळे त्याला धर्मशाला येथील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आळे नाही. आता तो २९ ऑक्टोबरला होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या आणि २ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीला मुकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची दुखापत वेळेत बरी न झाल्यास तो ५ नोव्हेंबरची ( वि. दक्षिण आफ्रिका) लढतही खेळू शकणार नाही. त्याचा पायाच किंवा लिगामेंटमध्ये लचक भरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.