ICC T20 Ranking मध्ये अभिषेक शर्मा, वरूण चक्रवर्ती चमकले, हार्दिक 'पांड्या नंबर १'

Hardik Abhishek Varun, ICC T20 Ranking: रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग यांचाही Top 10 मध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:10 IST2025-03-20T11:09:23+5:302025-03-20T11:10:22+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya tops in T20 All rounders Abhishek Sharma Varun Chakravathy maintains 2nd place in ICC T20 Rankings | ICC T20 Ranking मध्ये अभिषेक शर्मा, वरूण चक्रवर्ती चमकले, हार्दिक 'पांड्या नंबर १'

ICC T20 Ranking मध्ये अभिषेक शर्मा, वरूण चक्रवर्ती चमकले, हार्दिक 'पांड्या नंबर १'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya Abhishek Sharma Varun Chakravathy, ICC T20 Ranking: भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने आयसीसी टी-२० फलंदाजी क्रमवारीतील आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांमध्ये स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यानेही दुसरे स्थान कायम राखले आहे. तसेच, अष्टपैलूंमध्ये हार्दिक पांड्याने आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी आंतरराष्ट्रीय टी २० जाहीर केली. फलंदाजांमध्ये अव्वल पाचमध्ये अभिषेकसह तिलक वर्मा (चौथा) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (पाचवा) यांनी स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट हा तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅविस हेड अव्वल स्थानी कायम आहे.

गोलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचा अकील होसैन अव्वल असून वरुणने दुसरे स्थान कायम राखले आहे. त्यानंतर, इंग्लंडचा आदिल राशीद (तिसरा), श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा (चौथा) आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा (पाचवा) यांचा क्रमांक आहे. रवी बिश्नोई सहाव्या स्थानी आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग नवव्या क्रमांकावर आहे.

Web Title: Hardik Pandya tops in T20 All rounders Abhishek Sharma Varun Chakravathy maintains 2nd place in ICC T20 Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.