भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर नुकतीच इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. वर्ल्ड कप स्पर्धेतही हार्दिकला दुखापतीनं ग्रासले होते. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-20 मालिकेत तो खेळला, पण कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियेसाठी निघून गेला आणि आता तो तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
हार्दिकची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते. हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. ही दुखापत त्यावेळीही गंभीर होती. कारण त्यावेळी हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर हार्दिक दुखापतीमधून सावरला होता. लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही तो खेळला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिकने माघार घेतली होती. पण आता त्याच्या दुखापतींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हार्दिकला आता शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिकला मैदानात दुखापत झाली होती. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. या सामन्यातील अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
पाहा व्हिडीओ...
वाह रे पठ्ठ्या ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या
आपल्या लाडक्या क्रिकेटपटूसाठी चाहते कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. भारतात अशा प्रेमींची कमी नाही आणि यापूर्वी असे अनेक किस्से ऐकायला मिळाले आहेत. हार्दिक पांड्याच्या या चाहत्यानं स्वतःच्या शरीरावर 16 विविध भाषांत हार्दिकच नाव गोंदवून घेतलं आहे. कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात केलेल्या विवादास्पद वक्तव्यानंतर हार्दिकवर होत असलेली टीका पाहून मुगुंथन बेचैन झाला होता. हार्दिक या प्रकरणातून सुटावा आणि लवकरात लवकर टीम इंडियात त्यानं कमबॅक करावं, अशी प्रार्थना मुगुंथनने केली होती. मुगुंथनने हार्दिकची हेअरस्टाईलही कॉपी केली आहे.
कोईम्बतूर येथील मुगुंथन हार्दिकला चिअर करण्यासाठी धर्मशाला येथे येत असताना हा अपघात झाला. जवळपास 3000 किमीचे हे अंतर रस्त्यामार्गे गाठायचा निर्धार मुगुंथनने केला. 2000 किमचे अंतर पार केल्यानंतर जबलपूर येथे त्याचा अपघात झाला. त्याला त्वरीत नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.
वाऱ्याच्या वेगानं ही बातमी हार्दिकला समजली... मुगुंथनच्या अपघाताचे वृत्त कानावर पडताच हार्दिक अस्वस्थ झाला. त्याने त्वरित मुगुंथनच्या उपचाराचा सर्व खर्चाचा भार उचलला. उपचारानंतर 21 सप्टेंबरला मुगुंथन कोईम्बतूरला परतला. त्याने हार्दिकचे आभार मानले.