रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला

मुंबई इंडियन्स (MI) कर्णधार हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) संयम सुटलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:28 PM2024-04-27T18:28:57+5:302024-04-27T18:29:29+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya was not happy with the amount of time the DC captain Rishabh Pant was taking before facing the ball and the MI skipper screamed at the on-field umpire from the long-off boundary, Video  | रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला

रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live :  दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स (MI) कर्णधार हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) संयम सुटलेला पाहायला मिळाला. DC च्या २५७ धावांचा पाठलाग करताना MI ने आघाडीचे ३ फलंदाज ६५ धावांवर गमावले आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळेल असे चित्र होते, परंतु मुंबईने मात्र निराश केले. दरम्यान, पियुष चावला स्पेलच्या तिसऱ्या षटकाची तयारी करत असताना ११ व्या षटक सुरू होण्यापूर्वी हार्दिक संतापलेला दिसला. 

Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 

स्ट्राइकवर असलेला रिषभ पंत चेंडू खेळण्यापूर्वी बराच वेळ घेत होता. DC कर्णधार वेळ घेत असल्याचे पाहून हार्दिक संतापला आणि तो लाँग ऑफच्या बाऊंड्रीवरून अम्पायरकडे ओरडून याची तक्रार करत होता. 


हार्दिक पांड्याला सध्याच्या पर्वात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने आठ डावांमध्ये १५१ धावा केल्या आहेत आणि गोलंदाज म्हणून ११.९५ च्या इकॉनॉमी रेटसह नऊ सामन्यांमध्ये केवळ चार विकेट्स घेतल्या आहेत.


 तत्पूर्वी, २२ वर्षाच्या Jake Fraser-McGurk ने २७ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावा कुटल्या आणि अभिषेक पोरेलसह ( ३६) पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ११४ धावा फलकावर चढवल्या. शे होप ( ४१) व रिषभ पंत ( २९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. रिषभ व त्रिस्तान स्तब्स जोडीने २७ चेंडूंत ५५ धावांची फटकेबाजी केली. स्तब्सने २५ चेंडूंत  ६ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा करून संघाला ४ बाद २५७ धावांवर पोहोचवले. दिल्लीच्या या आयपीएलमधील सर्वोच्च धावा ठरल्या. यापूर्वी २०११ मध्ये पंजाबविरुद्ध ४ बाद २३१ धावा केल्या होत्या. 

Web Title: Hardik Pandya was not happy with the amount of time the DC captain Rishabh Pant was taking before facing the ball and the MI skipper screamed at the on-field umpire from the long-off boundary, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.