क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांचा घटस्फोट झाला आहे. हार्दिकने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करून पत्नीपासून वेगळं झाल्याची घोषणा केली. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं हार्दिकने सांगितलं. यानंतर हार्दिकला त्याच्या १७० कोटी रुपयांच्या संपत्तीतील ७० टक्के नताशालाद्यावे लागतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
घटस्फोट झाल्यानंतर आता हार्दिक पांड्याला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के नताशाला द्यावे लागतील असं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटस्फोट झाल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हापासून हार्दिकच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली आहे. चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत आहेत.
२०१८ मध्ये हार्दिकने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, त्याने आपली सर्व संपत्ती त्याच्या आईच्या नावावर ठेवली आहे, कारण तो भविष्यात त्याच्या उत्पन्नातील ५० टक्के कोणालाही देऊ इच्छित नाही. नियमानुसार, हार्दिकला नताशाला काही पैसे द्यावे लागतील. मात्र ही रक्कम किती असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
हार्दिकने घटस्फोटानंतर पोस्ट केली आहे. "चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास घेत आम्ही एक कुटुंब म्हणून वाटचाल केली."
"मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अगस्त्य आहे, जो नेहमी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची प्रायव्हसी तुम्ही समजून घ्याल" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.