Join us  

सूर्युकमार किंवा ऋतुराज यापैकी एक ट्वेंटी-२० संघाचा कॅप्टन होणार; हार्दिक पांड्याचं काय होणार?

वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रवासात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) झालेली दुखापत चाहत्यांना सतावणारी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 7:04 PM

Open in App

India vs Australia T20 Series : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने ८ सामन्यांत अपराजित मालिका कायम राखून गुणतालिकेत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या प्रवासात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) झालेली दुखापत चाहत्यांना सतावणारी ठरली. पण, मोहम्मद शमीने ती चिंता आपल्या भेदक माऱ्याने मिटवून टाकली. हार्दिकने स्पर्धेतूनच माघार घेतल्याने संघ व्यवस्थापनाने प्रसिद्ध कृष्णाला रिप्लेसमेंट म्हणून बोलावले.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतून हार्दिक पुनरागमन करेल अशी शक्यता होती. पण, बांगलादेशविरुद्ध त्याचा मुरगळलेला पाय बरा होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे रिपोर्ट नुसार समोर येतेय. त्यामुळे याही मालिकेचा तो भाग नसणार आहे. वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, लोकेश राहुल आदींना संघ व्यवस्थापन वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून विश्रांती देण्याच्या तयारीत आहेत. 

सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड यांचे ट्वेंटी-२०त पुनरागमन होईल. या दोघांपैकी एकाकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त PTI  ने दिले आहे. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. या मालिकेत भुवनेश्वर कुमार याच्याही पुनरागमनाची चर्चा आहे. भुवीने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२० संघ - मॅथ्यू वेड ( कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, सीन एबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा  

मालिकेचे वेळापत्रक ( Schedule ) पहिली ट्वेंटी-२० - २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणमदुसरी ट्वेंटी-२० - २६ नोव्हेंबर, तिरुअनंतपूरमतिसरी ट्वेंटी-२० - २८ नोव्हेंबर, गुवाहाटीचौथी ट्वेंटी-२० - १ डिसेंबर, नागपूरपाचवी ट्वेंटी-२० ३ डिसेंबर, हैदराबाद  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार अशोक यादवऋतुराज गायकवाड