Join us  

Hardik Pandya vs Sourav Ganguly : निवड समितीला दोष देणाऱ्या हार्दिक पांड्याने आता सौरव गांगुलीशी घेतला पंगा?; BCCI अध्यक्षाचा ऐकला नाही सल्ला

Hardik Pandya vs Sourav Ganguly :  पूर्णपणे तंदुरूस्त नसलेल्या हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी झालेल्या निवडीवरून प्रचंड वाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 2:20 PM

Open in App

Hardik Pandya vs Sourav Ganguly :  पूर्णपणे तंदुरूस्त नसलेल्या हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी झालेल्या निवडीवरून प्रचंड वाद झाला. त्यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी हार्दिकला विश्रांती देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही त्याची निवड करण्यात आलेली नाही. हार्दिकही तंदुरूस्तीसाठी कसून सराव करताना दिसत आहे. पण, त्याला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर फॉर्मासोबत तंदुरूस्तीही सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) त्याला एक सल्ला दिला होता, परंतु त्याला केराची टोपली दाखवताना हार्दिकने एक निर्णय घेतला.

हार्दिक यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत (  Ranji Trophy 2022) मध्ये खेळणार नाही. १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी बदोडा संघ जाहीर करण्यात आला आणि त्यात हार्दिकचे नाव नाही. केदार देवधर बदोडा संघाचा कर्णधार आहे, तर विष्णु सोळंकी उप कर्णधार आहे. बदोडा क्रिकेट असोसिएशनने २० सदस्यीय संघ जाहीर केला.  गांगुलीने हार्दिकला रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. गांगुली म्हणाला होता, हार्दिक दुखापतग्रस्त होता आणि पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला विश्रांती दिली गेली होती. जेणेकरून तो प्रदीर्घ काळ भारतीय संघासाठी योगदान देऊ शकले. तो रणजी करंडक स्पर्धेत खेळताना दिसेल, असा मला विश्वास आहे. त्याला अधिकाधिक षटक फेकताना मला पाहायला आवडेल.

२८ वर्षीय हार्दिक आता आयपीएल २०२२मध्येच खेळताना दिसेल. अहमदाबाद फ्रँचायझीने त्याला कर्णधारपद दिले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निवडीवरून हार्दिकने नुकतेच धक्कादायक विधान केले होते. हार्दिक म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा संपूर्ण दोष मला दिला गेला. प्रत्येक जण  माझ्यावरच दगड फेकत होता. मी गोलंदाजी केली नाही, हे खरं आहे. पण, माझी निवड एक फलंदाज म्हणून केली गेली होती. पहिल्या सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी मी अथक परिश्रम घेतले, परंतु मी गोलंदाजी करू शकलो नाही. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी केली, परंतु मला ती करायला नको हवी होती. मी संघासाठी गोलंदाजी केली. पण, त्याचा शेवट गोड झाला नाही.'' 

टॅग्स :हार्दिक पांड्याबीसीसीआयरणजी करंडकसौरभ गांगुली
Open in App