Video: मानलं भावा... हार्दिक पांड्याने मैदानात केलेल्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, सर्वत्र होतंय कौतुक

Hardik Pandya Fans Security, Viral Video: मैदानात घुसलेल्या चाहत्यांनी हार्दिककडे जाऊन त्याला मिठी मारली, त्याच्या पायाही पडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:40 IST2024-12-14T16:33:22+5:302024-12-14T16:40:08+5:30

whatsapp join usJoin us
hardik pandya won hearts 3 fans security breach Syed Mushtaq Ali Trophy 2024 SMAT semifinal mumbai vs baroda video viral | Video: मानलं भावा... हार्दिक पांड्याने मैदानात केलेल्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, सर्वत्र होतंय कौतुक

Video: मानलं भावा... हार्दिक पांड्याने मैदानात केलेल्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, सर्वत्र होतंय कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya Fans Security, Viral Video: एखादा सामना सुरु असताना चाहते सुरक्षाकडे भेदून आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटण्याची जोखीम उचलतात असा प्रकार बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. मुंबई आणि बडोदा यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बडोद्याचे प्रतिनिधित्व करत होता. त्याचवेळी ३ चाहते मैदानात घुसले आणि हार्दिकला भेटले. त्यानंतर हार्दिकने जे केलं, त्यामुळे त्याची सर्वत्र वाहवा होत आहे.

नक्की काय घडलं?

हार्दिक पांड्या मैदानात होता. सामना सुरु असताना ३ चाहते सुरक्षा कडे भेदून मैदानात घुसले. चाहत्यांनी हार्दिककडे जाऊन त्याला मिठी मारली. त्याच्या पायाही पडले. यादरम्यान सिक्युरिटी गार्ड तिघांनाही बाहेर काढू लागले. मात्र त्यानंतर हार्दिकने मागून सुरक्षा रक्षकांना हातवारे करत या तिघांनाही सोडून द्या, असे सांगितले. त्याने केलेल्या या कृतीचे खूप कौतुक होत आहे. सामना गमावला असला तरी हार्दिक पांड्याच्या त्या कृतीने मनं जिंकली असल्याची भावना सोशल मीडियावर दिसत आहे.

बडोदा OUT; हार्दिक पांड्याही चालला नाही!

दरम्यान, सेमीफायनल मध्ये मुंबईने बडोद्याचा पराभव बडोद्याने पहिल्या डावात फलंदाजी केली, मात्र हार्दिक पांड्या या सामन्यात छाप पाडू शकला नाही. अवघ्या ५ धावा करून तो बाद झाला. या संघाचा कर्णधार कृणाल पांड्यानेही ३० धावा केल्या तर सलामीवीर फलंदाज शाश्वत रावतने ३३ धावांची खेळी केली. मधल्या फळीतील फलंदाज शिवालिक शर्माने २४ चेंडूत नाबाद ३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली तर अतित सेठने १४ चेंडूत २२ धावा केल्या. त्यामुळे त्यांनी दीडशेपार मजल मारता आली. पण ती धावसंख्या विजयासाठी तोकडीच पडली. अजिंक्य रहाणेच्या दमदार ९८ धावांच्या खेळीने मुंबईला सहज फायनलचे तिकिट मिळवून दिले.

Web Title: hardik pandya won hearts 3 fans security breach Syed Mushtaq Ali Trophy 2024 SMAT semifinal mumbai vs baroda video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.