हार्दिक पंड्याची एक्स गर्लफ्रेंड काय म्हणाली, जाणून घ्या...

पंड्याच्या विधानावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड एली अवरामने आता मौन सोडले आहे आणि पंड्याबाबत तिने एक विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 02:49 PM2019-01-19T14:49:58+5:302019-01-19T14:51:05+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya's ex Girlfriends said on his statement | हार्दिक पंड्याची एक्स गर्लफ्रेंड काय म्हणाली, जाणून घ्या...

हार्दिक पंड्याची एक्स गर्लफ्रेंड काय म्हणाली, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी केल्याचे म्हटले गेले. पंड्याच्या विधानावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड एली अवरामने आता मौन सोडले आहे आणि पंड्याबाबत तिने एक विधान केले आहे.

पंड्या आणि राहुल यांच्यावर आता बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे.  या पंड्या आणि राहुल यांची आता चौकशी होणार आहे, त्याचबरोबर या दोघांनाही ऑस्ट्रेलियावरून भारतामध्ये माघारी बोलावले आहे.


या साऱ्या प्रकरणावर एली म्हणाली की, " मी पाहिलेला हार्दिक पंड्या हा नक्कीच नाही. कारण मी हार्दिकला जवळून ओळखते. यापूर्वी हार्दिक अशी गोष्ट कधीही बोललेला नाही. तुम्ही जेव्हा मोठ्या स्तरावर जाता तेव्हा तुम्हाला काही लोकं आदर्श मानत असतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची विधानं केलीत तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरू शकता." 

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरींनीही पंड्याच्या विधानांवर आक्षेप घेतला आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा चौधरींनी प्रशासकीय समितीकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना इडुल्जींना पत्र लिहिलं आहे. 'कॉफी विथ करण कार्यक्रमात क्रिकेटपटूंनी (हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल) केलेल्या विधानांमुळे भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. त्यांचं वर्तन चुकीचं होतं,' असं चौधरींनी पत्रात नमूद केलं आहे.

 

कॉफी विथ करण कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पण कोहलीला मात्र ही गोष्ट गंभीर असल्याचे वाटत नाही. याबाबत कोहली म्हणाला की, " पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहे. त्याचबरोबर ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. या त्यांच्या मताशी आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याचा संघावर किंवा आमच्या कामगिरीवर काहीही परीणाम होणार नाही. आता आम्ही फक्त याबाबत पुढे नेमके काय होते, यावर लक्ष ठेवून आहोत. "

Web Title: Hardik Pandya's ex Girlfriends said on his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.