दुबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत खांद्याला दुखापत झाली होती. ही जखम गंभीर नाही, तो न्यूझीलंडविरुद्ध ३१ ऑक्टोबर रोजी खेळू शकेल, असा खुलासा संघ व्यवस्थापनाने मंगळवारी केला. पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली होती. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्या खांद्याला लागला होता. या सामन्यात तो ८ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “हार्दिकच्या खांद्याचा स्कॅन रिपोर्ट आला आहे आणि दुखापत फारशी गंभीर नाही, भारत सहा दिवसांनी सामना खेळेल त्यामुळे हार्दिकला बरे होण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल. तरीदेखील वैद्यकीय पथक प्रतीक्षा करेल आणि प्रशिक्षणादरम्यान हार्दिकला कसे वाटते हे तपासेल.”‘मी बाद फेरीच्या सामन्यात गोलंदाजी करू शकेन,’असे पांड्याने अलीकडे म्हटले होते. त्यासाठी भारताला न्यूझीलंडवर विजय मिळवावाच लागेल. हा सामना गमावणे म्हणजे पुढचा मार्ग कठीण होणे, असा अर्थ आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हार्दिक पांड्याची जखम गंभीर नाही
हार्दिक पांड्याची जखम गंभीर नाही
Hardik Pandya : पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली होती. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्या खांद्याला लागला होता. या सामन्यात तो ८ चेंडूत ११ धावा करून बाद झाला.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 7:58 AM