भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर हार्दिक पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी उत्सुक आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आयपीएलमधील त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिक बराच काळ गोलंदाजी करत नव्हता, श्रीलंका दौऱ्यावर त्यानं गोलंदाजी केली. पण, त्याची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी फॉर्म मिळवण्याचा हार्दिकचा प्रयत्न आहे. मात्र, हार्दिक आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे आणि ती चर्चा त्याच्या घड्याळामुळे रंगली आहे.
पांड्या ब्रदर्स झाले मुंबईकर; हार्दिक-कृणालने घेतला 8 BHK फ्लॅट, दिशा पटानी अन् टायगर श्रॉफ आहेत शेजारी!
हार्दिकनं सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत आणि त्यात त्यानं नव्या घड्याळाचाही फोटो पोस्ट केला आहे. या घड्याळाची किंमत वाचून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूनं Patek Philippe Nautilus Platinum 5711 हे घड्याळ खरेदी केलं आहे आणि त्याची किंमत ही ५ कोटींहून अधिक आहे. हार्दिक महागड्या वस्तूंचा शौक आहे आणि त्याच्याकडे महागड्या गाड्यांचेही कलेक्शन आहे.
लिओनेल मेस्सीच्या टीशू पेपरसाठी साडेचार कोटींची बोली, हॉट मॉडेलची न्यूड फोटो काढण्याची तयारी!
पांड्या ब्रदर्स झाले मुंबईकर; हार्दिक-कृणालने घेतला 8 BHK फ्लॅट
भारतीय संघातील अष्टपैलू भावंडांची जोडी हार्दिक आणि कृणाल पांड्या हे मुंबईकर झाले आहेत. त्यांनी मुंबईत 8 BHK फ्लॅट खरेदी केला आहे. हार्दिक आणि कृणाल यांनी रुस्तमजी पॅरामाऊंट सोसायटीत हे घर खरेदी केलं आहे. हा फ्लॅट ३८३८ स्क्वेअर फुटांचा असून ४+४ असे आठ रुम आहेत. याची किंमत ३० कोटींच्या घरात आहे. हार्दिक आणि कृणाल यांनी रुस्तमजी पॅरामाऊंट सोसायटीत हे घर खरेदी केलं आहे. हा फ्लॅट ३८३८ स्क्वेअर फुटांचा असून ४+४ असे आठ रुम आहेत. याची किंमत ३० कोटींच्या घरात आहे. हार्दिक व कृणालनं ज्या सोसायटीत घर खरेदी केलं आहे, तिथे दिशा पटानी व टायगर श्रॉफ यांचाही फ्लॅट आहे.
Read in English
Web Title: Hardik Pandya's newest watch, a Patek Philippe Nautilus Platinum 5711, costs over Rs 5 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.