IPL 2022 T20 Match LSG vs GT : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील पदार्पणाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स या नवख्या संघाविरुद्ध गुजरातने ५ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवला. ( Lucknow Super Giants Vs Gujarat Titans). मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर आणि मॅथ्यू वेड हे गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या सामन्यात कृणाल व हार्दिक हे पांड्या बंधू प्रथमच आमनेसामने आले. मुंबई इंडियन्सकडून एकाच संघाकडून इतकी वर्ष खेळणारे पांड्या बंधू कालच्या सामन्यात प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले. हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे, तर कृणाल यंदा लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करतोय.
लखनौच्या दीपक हुडा ( ५५) व आयूष बदोनी ( ५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने १५९ धावांचे लक्ष्य उभे केले. मोहम्मद शमीने २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात हार्दिक व मॅथ्यू वेडने गुजरातला विजयाच्या मार्गावर ठेवले होते. वेड ३० आणि हार्दिक ३३ धावांवर माघारी परतले. लखनौचे पारडे जड वाटत असताना राहुल तेवतिया ( Rahul Tewatia) व डेव्हिड मिलर यांनी बाजी पलटवली. या दोघांनी ३४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. मिलर २१ चेंडूंत ३० धावा करून बाद झाला. तेवतियाने २४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अभिनव मनोहरने ७ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या.
हार्दिक फटकेबाजीच्या मूडमध्ये असताना कृणाल गोलंदाजीला आला आणि त्याने लखनौला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने खणखणीत फटका मारला, परंतु चेंडू हवेतच उत्तुंग उडाला आणि मनीष पांडेने सहज झेल टिपला. भावाची विकेट मिळाल्यानंतर कृणालने सेलिब्रेशन केले नाही, परंतु हार्दिक पत्नी नताशा स्टँकोव्हिच नाराज दिसली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पाहा व्हिडीओ..