भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं २०२० वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगाला शॉक दिला... दुबईत त्यानं गुपचूप बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच ( Natasha Stankovic) हिच्यासोबत साखरपूडा केला. हा झटका कमी होता की काय, लग्नाआधीच नताशा प्रेग्नेंट असल्याचे समोर आले होते. हार्दिक - नताशा यांचा मुलगा दोन वर्षांचा होण्याआधीच पांड्या कुटुंबात पुन्हा एकदा पाळणा हलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पांड्या कुटुंबीयांनी ख्रिस्मसचं सेलिब्रेशन केलं आणि त्यात दिसणाऱ्या नताशाच्या फोटोमुळे हार्दिक पुन्हा बाबा बनणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पांड्या कुटुंबियांनी घरी दणक्यात ख्रिस्मस साजरा केला. त्यात नताशा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पण, त्यात दिसणारे तिचे ‘baby bump’ लक्ष वेधून घेत आहे. तिच्या फोटोखाली अनेकांनी नताशाला तू प्रेग्नेंट आहेस का, अशी विचारणा केली आहे.
नताशा आणि हार्दिक यांनी ३१ मे २०२० ला लग्न केलं आणि ३० जुलै २०२० मध्ये दोघंही आई-बाबा बनले. अगस्त्या हे त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव आहे.
हार्दिक सध्या क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे त्यानं ब्रेक घेतला आहे आणि त्याचे टीम इंडियात परतणे अवघड दिसत आहे. आयपीएल २०२१मध्ये फार कमाल करू न शकलेल्या आणि गोलंदाजी न करणाऱ्या हार्दिकची वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघातील निवड चर्चेचा विषय ठरली होती. तो पूर्णपणे तंदुरूस्त नसूनही त्याला निवडले गेले आणि त्याचा कुठेतरी फटका टीम इंडियाला बसलेला पाहायला मिळाला. त्यानंतर बीसीसीआयनं हार्दिकला NCA मध्ये जाऊन फिटनेस टेस्ट देण्यास सांगितले आहे. जोपर्यंत तो तंदुरूस्ती सिद्ध करत नाही, तोपर्यंत त्याला राष्ट्रीय संघात प्रवेश मिळणार नसल्याचा पवित्रा बीसीसीआयनं घेतला आहे.
Web Title: Hardik Pandya’s wife Natasa Stankovic sparks pregnancy rumours after sharing photos from Christmas celebration
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.