ठळक मुद्देकसोची मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडे 2-0 अशी आघाडीतिसरा कसोटी सामना 11 जानेवारीपासून
लाहोर : पाकिस्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज हॅरीस सोहेल याला गुडघेदुखीमुळे दक्षिण आफ्रिका अर्ध्यावर सोडावा लागला. दुखापतीमुळे सोहेलने संघाच्या सराव सत्रातही सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटीत त्याच्याजागी शान मसूदला संधी देण्यात आली. आफ्रिका दौऱ्यावरून मायदेशी परतताच सोहेलने काळ्या जादूमुळे गुडघेदुखी झाल्याचा दावा केला.
दुखापतीमुळे सोहेलला अनेकदा संघाबाहेर बसावे लागले. 2013 मध्येही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण याच कारणामुळे पुढे ढकलले गेले होते. यावेळी त्याला दौरा निम्म्यावर सोडावा लागला. मायदेशी परतण्यापूर्वी संघ व्यवस्थापनासमोर त्याने भूतबाधा झाल्याचा दावा केला. तो म्हणाला,'' माझ्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे आणि त्यामुळेच मला वारंवार दुखापत होत आहे.''
दरम्यान डॉक्टरांनी त्याला 3-4 आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पुनर्वसन केंद्रात न जाता आपल्या घरी परतला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा कसोटी सामना 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
Web Title: Haris Sohail has claimed that he is bedeviled by supernatural presence
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.