Join us  

Harmanpreet Kaur ची फास्टर फिफ्टी; Smriti Mandhana चा विक्रम मोडला

भारताच्या डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत तिने अर्धशतकाला गवसणी मारली. तिच्या खेळीत जो एक षटकार आला तो यंदाच्या स्पर्धेतील सर्वात लांब षटकारही ठरला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:21 AM

Open in App

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आपलीच सहकारी आणि भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा मोठा विक्रम मोडीत काढला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने २७ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. तिच्या या खेळीत ८ चौकार आणि एका उत्तुंग षटकाराचा समावेश होता. भारताच्या डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत तिने अर्धशतकाला गवसणी मारली. तिच्या खेळीत जो एक षटकार आला तो यंदाच्या स्पर्धेतील सर्वात लांब षटकारही ठरला.  

हरमनप्रीतनं उप कॅप्टन स्मृती मानधनाचा विक्रम टागला मागे 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीसह  महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकवल्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम भारताची उप कर्णधार स्मृती मानधनाच्या नावे होते. भारताच्या डावाची सुरुवात करणाऱ्या स्मृती मानधना हिने २०१८ मध्ये २९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकवणाऱ्या बॅटर

 २७ - हरमनप्रीत कौर विरुद्ध श्रीलंका, दुबई, २०२४

३१ - स्मृती मानधना विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गुयाना, २०१८

३२ - हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, केप टाउन, २०२३

३३ - हरमनप्रीत कौर विरुद्ध न्यूझीलंड, गुयाना, २०१८

३६ - मिताली राज विरुद्ध श्रीलंका, बॅसेटेरे, २०१०

सर्वात लांब सिक्सर

हरमनप्रीत कौरनं जलद अर्धशतकाशिवाय यंदाच्या हंगामातील सर्वात लांब सिक्सर मारण्याचा पराक्रमही या सामन्यात केला. तिने आपल्या अर्धशतकी खेळीत मारलेला षटकार हा ८४ मीटर अंतरावर जाऊन पडला. तिने दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट आणि वेस्टइंडीजच्या डेआंड्रा डॉटिनला मागे टाकले. या दोघींनी यंदाच्या स्पर्धेत ८२ मीटर अंतर पार करणारा षटकार मारला होता. 

आता ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान भारतीय संघ महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत नेट रन रेटही सुधारले. यात हरमनप्रीत कौरच्या खेळीचा वाटा मोठा आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातही अशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ