भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) सध्या चर्चेत आहे, ती तिच्या बेशिस्त वागणुकीमुळे... बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना हरमनप्रीत कौरने जाहीर टीका केली, स्टम्पवर बॅट मारली अन् नंतर प्रेझेंटेशन सोहळ्यात अम्पायर व बांगलादेश संघाचा अपमान केला. त्यामुळे आता आयसीसी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ३५ वर्षीय हरमनप्रीतला ४ वजा गुण देण्याच्या हालचाली आयसीसीने सुरू केल्या आहेत आणि त्यामुळे आगामी आशियाई स्पर्धेतील तिच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो का?
हरमनप्रीत कौरचा बेशिस्तपणा पाहून बांगलादेशचे खेळाडू भडकले; ट्रॉफीसोबत फोटो न काढताच निघून गेले
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत खेळणार आहे. स्मृती मानधना उप कर्णधार असणार आहे. Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे. पण क्रिकेटचे सामने १९ ते २८ सप्टेंबरला होतील. आयसीसीच्या नियमानुसार चार वजा गुण म्हणजे दोन निलंबित गुण... म्हणजेत एक कसोटी आणि दोन ट्वेंटी-२० किंवा वन डे सामन्यांची बंदी. त्यामुळे जर आयसीसीने हरमनप्रीतला ४ वजा गुण दिले, तर तिला पुढील दोन सामन्यांत खेळता येणार नाही.
भारतीय संघ आता थेट आशियाई स्पर्धेत खेळणार आहे, तर मग हरमनप्रीत कौर Asian Games 2023 स्पर्धेत खेळू शकणार नाही का? यावेळी भारतीय कर्णधार नशिबवान ठरली आहे. आशियाई स्पर्धा ही आयसीसीच्या अधिकारात येत नाही आणि त्यामुळे हरमनप्रीत केवळ आयसीसी मान्यता स्पर्धेतील सामन्यांना मुकणार आहे. आयसीसीने अद्याप त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही, परंतु हरमनप्रीतवर कठोर कारवाई होईल हे निश्चित आहे.
आशियाई स्पर्धेसाठीचा भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती माधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली शर्वणी, तितास सधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कानिका अहुजा, उमा चेत्री ( यष्टिरक्षक), अनुषा बारेड्डी, राखीव खेळाडू - हर्लीन देओल, काश्वी गौतम, स्नेह राणा, साईका इशाक, पूजा वस्त्राकर