Harmanpreet Kaur India vs Bangladesh: भारतीय महिला क्रिकेट संघ 3 एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. मालिका खूप रोमांचक आणि वादग्रस्तही ठरली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवला. तर तिसरा सामना बरोबरीत सुटला. अशा प्रकारे ही मालिकाही बरोबरीत सुटली.
पण, तिसऱ्या सामन्यात वाद पाहायला मिळाला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला एलबीडब्ल्यू आऊट देण्यावरुन हा वाद झाला. आऊट होताच हरमनने संतापाच्या भरात बॅटने स्टंप पाडला आणि पंचाशीही वाद घातला. या कृत्यासाठी हरमनला दंड होऊ शकतो.
हरमनला मिळू शकतात 3 डीमॅरिट पॉइंट
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, एका मॅच अधिकाऱ्याने सांगितले की, हरमनप्रीत कौरला मॅच फीच्या 75 टक्के दंड आकारला जाऊ शकतो. तो म्हणाला की, तिचे कृत्य नियमांच्या लेव्हल-2 चे उल्लंघन आहे. हा नियम मैदानात खेळाडूंच्या वर्तनाशी संबंधित आहे.
सामना अधिकाऱ्याने सांगितले की, 'मैदानावर घडलेल्या घटनेसाठी हरमनप्रीतला मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारला जाईल. सामन्यानंतर हरमनने पंचांवर काही आरोप केले. त्यासाठी तिला मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात येऊ शकतो.
काय म्हणाली हरमन काय?सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, 'बांगलादेशच्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. आम्ही जेव्हा फलंदाजी करत होतो तेव्हा आम्ही खेळावर चांगले नियंत्रण ठेवले होते, परंतु अतिशय खराब अंपायरिंगमुळे सामन्याचा निर्णय बदलला. पंचांनी दिलेल्या काही निर्णयांमुळे आम्ही खरोखरच निराश झालो आहोत.'