Join us  

स्मृती मानधनानं नाव कमावलं, ICCच्या ट्वेंटी-२० व वन डे संघात पटकावले स्थान; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

ICC Women's ODI team of the year 2022 : आयसीसीने पुरुषांच्या वन डे संघापाठोपाठ महिलांच्या सर्वोत्तम वन डे संघ आज जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 2:18 PM

Open in App

ICC Women's ODI team of the year 2022 : आयसीसीने पुरुषांच्या वन डे संघापाठोपाठ महिलांच्या सर्वोत्तम वन डे संघ आज जाहीर केला. महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने काल २०२२ मधील सर्वोत्तम ट्वेंटी-२०संघात स्थान पटकावले होते आणि तिने आज वन डे संघातही जागा पटकावली. भारताच्या तीन महिला खेळाडूंचा वर्षातील सर्वोत्तम वन डे संघात समावेश केला गेला असून हरमनप्रीत कौरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 

  • अॅलिसा हिली (wk) (ऑस्ट्रेलिया) -  आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या अॅलिसा हिलीचा सर्वोत्तम वन डे संघात समावेश केला गेला आहे. हीलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीत १२९ धावांची शानदार खेळी केली आणि इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात १७० धावा चोपल्या  ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. हीलीने महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ५०९ धावा केल्या.  
  • स्मृती मानधना (भारत) - भारताच्या डावखुऱ्या फलंदाजाने २०२२ मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना कॅलेंडर वर्षात एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावले. न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध तिने शानदार १२३ धावांची खेळी केली. मानधनाने सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ९१ धावा केल्या. 
  • लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने वर्षाची सुरुवात घरच्या भूमीवर सनसनाटी शैलीत केली, संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान तो फॉर्म कायम ठेवला. वोल्वार्डने फेब्रुवारीमध्ये जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११७ धावांची खेळी केली आणि न्यूझीलंडमध्ये वन डे वर्ल्ड कपमध्ये  तिने चार अर्धशतकं झळकावली.   
  • नॅट सायव्हर (इंग्लंड) - वर्ल्ड कप स्पर्धेत नॅटच्या बॅटने कमाल केली. तिन स्पर्धेत दोन शतकं ठोकताना ४३६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये तिच्या नाबाद १४८* धावांमुळे सामन्यात रंगत आली होती. तिने  कॅलेंडर वर्षात ८३३ धावा केल्या आणि १२ विकेट्स घेतल्या. 
  • बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) - बेथ मुनीने २०२२ मध्ये १० वन डे सामन्यांत ४०३ धावा केल्या आणि केवळ चार वेळा बाद झाली.  
  • हरमनप्रीत कौर (कर्णधार) (भारत) - भारताची अनुभवी अष्टपैलू खेळाडू जागतिक क्रिकेटमधील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. तिने कॅलेंडर वर्षात दोन शतकं आणि पाच अर्धशतकं ठोकली. सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध तिने नाबाद १४३* धावा केल्या होत्या.  
  • अमेलिया केर (न्यूझीलंड) - संघात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची अष्टपैलू अमेलिया केरसारखी खेळाडू असेल तर  प्रतिस्पर्धी संघाची खैर नाही. केरने २०२२ मध्ये  ६७६ धावा केल्या आणि १७ विकेट्स घेतल्या.  
  • सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) - इंग्लंडचा फिरकीपटूने  वर्ल्ड कप स्पर्धेत २२ विकेट्स घेतल्या.   
  • अयाबोंगा खाका (दक्षिण आफ्रिका)- दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज 2022 मध्ये सातत्य राखले आणि तिने १८ सामन्यांत २७  बळी मिळवले.
  •  रेणुका सिंग (भारत) - रेणुकाने २०२२ च्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले आणि या वर्षभरात तिने ७ सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या.  
  • शबनिम इस्माईल (दक्षिण आफ्रिका) -  शबनीम इस्माईलने १७ वन डे सामन्यांत ३७ विकेट्स घेतल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :स्मृती मानधनाआयसीसी
Open in App