Join us  

Harpreet Brar IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : हरप्रीत ब्रारने SRHचे ग्रह फिरवले; पण वॉशिंग्टन सुंदर, रोमारीओ शेफर्डने PBKSला तारे दाखवले!

राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek sharma) यांनी दमदार फलंदाजी करताना PBKSला सडेतोड उत्तर दिले. त्यात वॉशिंग्टन सुंदर व रोमारीओ शेफर्ड यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली व हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 9:15 PM

Open in App

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तिसऱ्याच षटकात त्यांच्या अंगलट आला. पंजाब किंग्सच्या कागिसो रबाडाने SRHला धक्का दिला. पण, राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek sharma) यांनी दमदार फलंदाजी करताना PBKSला सडेतोड उत्तर दिले. मात्र, हरप्रीत ब्रारने ( Harpreet Brar ) तीन मोठे धक्के दिले अन् सामना पुन्हा PBKSच्या पारड्यात आणला.  वॉशिंग्टन सुंदर व रोमारीओ शेफर्ड यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली व हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. 

कागिसो रबाडाने तिसऱ्या षटकात हैदराबादला पहिला धक्का दिला. प्रियाम गर्ग ( ४) मयांक अग्रवालच्या हाती झेलबाद झाला. अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी यांनी SRHचा डाव सावरला. ६व्या षटकात नॅथन एलिसच्या पहिल्याच चेंडूवर त्रिपाठीने सरळ फटका मारला, एलिसने तो टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा वेग खूप होता. चौथा चेंडू त्रिपाठीने सीमापार पाठवला. राहुल त्रिपाठी व अभिषेक शर्मा यांची ४७ धावांची भागीदारी हरप्रीत ब्रारने संपुष्टात आणली. त्रिपाठी २० धावांवर शिखर धवनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्रिपाठीने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत ३७.५४च्या सरासरीने ४१३ धावा केल्या. 

हरप्रीतने पुढील षटकात SRHला आणखी एक धक्का दिला. अभिषेकने मारलेला उत्तुंग फटका लिएम लिव्हिंगस्टोनने सीमारेषेवर अप्रतिमरित्या टिपला. अभिषेक ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. आयपीएल २०२२मध्ये त्याने SRHकडून सर्वाधिक ४२६ धावा केल्या आहेत. निकोलस पूरन ( ५ ) अपयशी ठरला, एलिसने त्याला बाद केले. एडन मार्कराम ( २१)  चांगला खेळत होता, परंतु हरप्रीतच्या फिरकीला समजण्यात तो चुकला अन् जितेश शर्माने तितक्याच चपळतेने त्याला यष्टीचीत केले. SRHचा निम्मा संघ ९६ धावांत माघारी परतला होता. हरप्रीतने ४ षटकांत २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

वॉशिंग्टन सुंदर व रोमारीओ शेफर्ड यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. रबाडाने टाकलेल्या १८व्या षटकात १९ धावा चोपल्या गेल्या. सुंदर व शेफर्ड यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. २९ चेंडूंत ५८ धावांची ही भागीदारी २०व्या षटकात सुंदरच्या ( २५) विकेटने संपुष्टात आली. एलिसने अखेरच्या षटकात दोन धक्के दिले. त्याची हॅटट्रिक हुकली. शेफर्ड १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादने ८ बाद १५७ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्स
Open in App