RCB चा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि RCB च्या चाहत्यांना धक्का देणारी वाईट बातमी आली. हर्षलच्या बहिणीचे शनिवारी निधन झाले. त्यामुळे तो RCBच्या बायो-बबलमधून बाहेर पडला. गत शनिवारी (9 एप्रिल) हर्षलच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. तिची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती. बहिणीच्या निधनानंतर घरी परतलेल्या हर्षलने तिच्या आठवणी जागवल्या आहेत. हर्षला बहिणीच्या निधनाचे दु:ख आणि बहिणीची इच्छा सोबत घेऊन हर्षल शनिवारी पुन्हा मैदानात उतरला.
आरसीबी आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात 16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात हर्षल पटेल मैदानात उतरला. 31 वर्षीय जलदगती गोलंदाज हर्षलने बहिण अर्पिता पटेलसोबतच्या आयपीएल सामन्यांपूर्वीच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. ''दीदी, तू आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी आणि दयाळू व्यक्तींपैकी एक होती. तू तुझ्या शेटवच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर स्मीतहास्य ठेऊनच आयुष्यातील कठिण परिस्थितींचा सामना केला. मी जेव्हा भारतात परत येण्यापूर्वी तुझ्यासोबत रुग्णालयात होतो तेव्हा, खेळावर लक्ष केंद्रीत कर, तू काळजी करू नकोस असा विश्वास मला दिला होता. त्यामुळेच, मी काल रात्री पुन्हा मैदानावर उतरू शकलो,'' अशी भावनिक पोस्ट हर्षल पटेलने लिहिली आहे.
मी तुला आठवणीत ठेवण्यासाठी आणि सन्मान देण्यासाठी केवळ एवढंच करू शकतो. मी ते सर्व करेन, ज्यामुळे तुला माझा अभिमान वाटत होता. मी माझ्या आयुष्यातील सुख आणि दु:खात तुला स्मरण करेन. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, आराम कर दीदी, शांती जडी... अशा शब्दात हर्षलने बहिणीच्या आठवणी जागवल्या आहेत. हर्षलच्या या इंस्टा पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, श्रद्धांजलीही वाहिली आहे.