Harshal Patel : जसप्रीत बुमराहनंतर हर्षल पटेलने फलंदाजीत दाखवली कमाल, ८ चेंडूंत चोपल्या ३८ धावा अन्... 

Harshal Patel : India vs Northamptonshire CCC Warm Up game : कर्णधार जसप्रीत बुमराहने भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या कसोटीत फलंदाजीत विश्वविक्रमी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 10:50 PM2022-07-03T22:50:08+5:302022-07-03T22:50:30+5:30

whatsapp join usJoin us
Harshal Patel madness in the Warm Up game against Northamptonshire CCC - fifty from 32 balls. He was on 10 (15), scored last 44 runs in just 19 balls | Harshal Patel : जसप्रीत बुमराहनंतर हर्षल पटेलने फलंदाजीत दाखवली कमाल, ८ चेंडूंत चोपल्या ३८ धावा अन्... 

Harshal Patel : जसप्रीत बुमराहनंतर हर्षल पटेलने फलंदाजीत दाखवली कमाल, ८ चेंडूंत चोपल्या ३८ धावा अन्... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Harshal Patel : India vs Northamptonshire CCC Warm Up game : कर्णधार जसप्रीत बुमराहने भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या कसोटीत फलंदाजीत विश्वविक्रमी कामगिरी केली. स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने २९ धावा चोपल्या आणि कसोटीत एका षटकात फलंदाजाने चोपलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. बर्मिंगहॅम येथे जसप्रीतच्या फटकेबाजीनंतर नॉर्थहॅम्प्टन येथे हर्षल पटेलने ( Harshal Patel) कहर केला. भारत विरुद्ध नॉर्थहॅम्टनशायर यांच्यातल्या ट्वेंटी-२० सराव सामन्यात हर्षलने खणखणीत अर्धशतक झळकावले. भारताची अवस्था ११.१ षटकांत ५ बाद ७२ अशी झाली असताना हर्षलने फटकेबाजी केली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताला पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनच्या ( ०) रूपाने धक्का बसला. राहुल त्रिपाठी ( ७), सूर्यकुमार यादव ( ०), इशान किशन ( १६) हे आयपीएल  स्टारही  फेल ठरले. कर्णधार दिनेश कार्तिकने २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. वेंकटेश अय्यर २० धावा करून बाद झाला. ५ बाद ७२ अशी अवस्था असताना हर्षल पटेल फलंदाजीला आला. सुरुवातीच्या १५ चेंडूंवर त्याने १० धावा केल्या, परंतु त्यानंतर पुढील १९ चेंडूंत त्याने ४४ धावा कुटल्या. त्याने ३६ चेंडूंत ५४ धावा केल्या. त्यात ५ चौकार व ३ षटकार अशा केवळ ८ चेंडूंत ३८ धावांचा समावेश होता. भारताने ८ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारली.


नॉर्थहॅम्प्टशायरच्या १५ षटकांत ७ बाद ११२ धावा झाल्या आहेत. आवेश खानने दोन विकेट्स घेतल्या, तर अर्षदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल व वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतलीय. 

Web Title: Harshal Patel madness in the Warm Up game against Northamptonshire CCC - fifty from 32 balls. He was on 10 (15), scored last 44 runs in just 19 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.