इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians Captain) कर्णधारपदी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) निवड केली. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI ने पाच जेतेपदं पटकावली आणि आता तोच रोहित आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही मेंटॉरपद सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ?
सचिन तेंडुलकर २००८ मध्ये मुंबई इंडियन्स संघात एक खेळाडू म्हणून सहभागी झाला आणि तो २०१३ पर्यंत या संघासाठी खेळत राहिला. यानंतर मुंबई संघाने त्याच्याकडे मेंटॉरपदाची जबाबदारी सोपवली. सचिन ६ वर्षे मुंबईकडून आयपीएल खेळला आणि यादरम्यान त्याने ७८ सामन्यांमध्ये २३३४ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि १३ अर्धशतके झळकावली. सचिनने २९५ चौकार आणि २९ षटकार मारले. रोहितनंतर आता सचिन तेंडुलकरही मेंटॉरपदाची जबाबदारी सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पण, हे वृत्त खोटे आहे.
रोहित शर्माचं काय?
२०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीपासून रोहित शर्मा ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलेला नाही. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही तो भारतीय संघाकडून खेळेल याची शक्यता कमी आहे. अशात मुंबई इंडियन्सनेही भविष्याचा विचार करून हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. रोहित ३६ वर्षांचा आहे आणि त्याच्या देखरेखीखाली हार्दिककडून संघ तयार व्हावा अशी फ्रँचायझीची इच्छा आहे.
पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद यांना कायम राखले आहे. अर्जुन तेंडुलकरने मागील पर्वात आयपीएलमध्ये पदार्पण करताना ठिकठाक कामगिरी केली होती. तोही संघात कायम आहे. शॅम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयुष चावला, आकाश माधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड ( ट्रेड लखनौ सुपरजायंट्स) यांना कायम राखले आहे.
Web Title: Has Sachin Tendulkar Resigned As MI’s Mentor After Hardik Pandya Was Made Captain? check trueth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.