Join us  

PAK vs SL Final: पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवणाऱ्यांना हसन अलीने दिले जोरदार प्रत्युत्तर, पाहा व्हिडीओ

पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवणाऱ्यांना हसन अलीने व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 3:40 PM

Open in App

नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर पार पडलेल्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) मानकरी यजमान श्रीलंकेचा संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव करून श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच श्रीलंकेला मोठे झटके दिले. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. किताबाच्या लढतीत पाकिस्तानच्या संघाने अनेक चुका केल्या. शादाब खानने सोडलेला झेल पाकिस्तानला चांगलाच महागात पडला.

दरम्यान, पाकिस्तान खराब फिल्डिंगमुळे नेहमीच ट्रोल होत असतो. भारताविरूद्धच्या सामन्यात देखील एक झेल घेण्यासाठी पाकिस्तानचे 2 खेळाडू चेंडूखाली आले होते. असेच काहीसे कालच्या सामन्यात पाहायला मिळाले. श्रीलंकेचा स्टार खेळाडू आणि फायनलच्या सामन्याचा हिरो असलेल्या राजपक्षाचा सोपा झेल पाकिस्तानने सोडला. शादाब खानने झेल सोडल्यामुळे माफी देखील मागितली आणि संघाच्या पराभवाची जबाबदारीही स्वीकारली. राजपक्षाने अवघ्या 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. राजपक्षाचा झेल घेण्यात शादाब खानला यश आले असते तर कदाचित सामन्याचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागला असता. 

सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवली जात आहे. दिल्ली पोलिसांनी देखील पाकिस्तानी खेळाडूंचा मजेशीर व्हिडीओ शेअर करून निशाणा साधला होता. आता यालाच प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी घेतलेले जबरदस्त झेल, शानदार फिल्डिंगचा प्रत्यय दाखवण्यात आला आहे. एकूणच हसन अलीने व्हिडीओच्या माध्यमातून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. 

हसन अलीने व्हिडीओतून दिले प्रत्युत्तर 

श्रीलंकेने सहाव्यांदा जिंकला आशिया कप अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरूवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 

 

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानश्रीलंकाट्रोलटी-20 क्रिकेट
Open in App