शारजा : आयसीसी वन-डे क्रमवारीत प्रथमच नंबर वन गोलंदाज झालेल्या हसन अलीचा अचूक मारा आणि बाबर आजम व शोएब मलिक यांच्यादरम्यान झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत शुक्रवारी श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देण्याच्या दिशेने वाटचाल केली.
अलीने ३७ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याला इमाद वसीम (२-१३) व शादाब खान (२-२९) यांची योग्य साथ लाभली. फलंदाजी स्वीकारणाºया श्रीलंकेचा डाव ४३.४ षटकांत १७३ धावांत संपुष्टात आला. त्यांच्यातर्फे केवळ लाहिरू थिरिमानेने (६२) संघर्षपूर्ण खेळ केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ३९ षटकांत ३ बाद १७७ धावांची मजल मारत विजय साकारला. लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ पाकची ३ बाद ५८ अशी अवस्था होती. त्यानंतर आजम (नाबाद ६९ धावा, ५ चौकार) व मलिक (नाबाद ६९ धावा, २ चौकार, ३ षटकार) यांनी ११९ धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
Web Title: Hasan Ali's penetrating hit, Pakistan's easy defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.