शारजा : आयसीसी वन-डे क्रमवारीत प्रथमच नंबर वन गोलंदाज झालेल्या हसन अलीचा अचूक मारा आणि बाबर आजम व शोएब मलिक यांच्यादरम्यान झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत शुक्रवारी श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देण्याच्या दिशेने वाटचाल केली.अलीने ३७ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याला इमाद वसीम (२-१३) व शादाब खान (२-२९) यांची योग्य साथ लाभली. फलंदाजी स्वीकारणाºया श्रीलंकेचा डाव ४३.४ षटकांत १७३ धावांत संपुष्टात आला. त्यांच्यातर्फे केवळ लाहिरू थिरिमानेने (६२) संघर्षपूर्ण खेळ केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ३९ षटकांत ३ बाद १७७ धावांची मजल मारत विजय साकारला. लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ पाकची ३ बाद ५८ अशी अवस्था होती. त्यानंतर आजम (नाबाद ६९ धावा, ५ चौकार) व मलिक (नाबाद ६९ धावा, २ चौकार, ३ षटकार) यांनी ११९ धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हसन अलीचा भेदक मारा, पाकची लंकेवर सहज मात
हसन अलीचा भेदक मारा, पाकची लंकेवर सहज मात
आयसीसी वन-डे क्रमवारीत प्रथमच नंबर वन गोलंदाज झालेल्या हसन अलीचा अचूक मारा आणि बाबर आजम व शोएब मलिक यांच्यादरम्यान झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत शुक्रवारी श्रीलंकेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 1:47 AM