Asia Cup 2022: आशिया चषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका; एकाच दिवसात २ खेळाडूं गंभीर जखमी

आशिया चषक २०२२ पूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:23 PM2022-08-21T17:23:20+5:302022-08-21T17:24:14+5:30

whatsapp join usJoin us
hasan mahmud and Mahedi Hasan, 2 players of Bangladesh have been injured before the Asia Cup 2022 | Asia Cup 2022: आशिया चषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका; एकाच दिवसात २ खेळाडूं गंभीर जखमी

Asia Cup 2022: आशिया चषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका; एकाच दिवसात २ खेळाडूं गंभीर जखमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) ला सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत. या बहुचर्चित सामन्यापूर्वी पाकिस्तान आणि भारत (India And Pakistan) या दोन्ही संघाना झटका बसला. भारताकडून जसप्रीत बुमराह तर पाकिस्तानचा शाहिन शाह आफ्रिदी स्पर्धेला मुकणार आहे. स्पर्धेला आता अवघे काही दिवस राहिले असताना सर्व संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. बांगलादेशकडून (Bangladesh) फॉर्मात असलेला फलंदाज लिटन दास आधीच स्पर्धेबाहेर आहे आणि आता आणखी दोन खेळाडू प्रशिक्षणादरम्यान जखमी झाले आहेत. नुरुल हसनच्या फिटनेसवर अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. एकाच दिवशी दोन खेळाडूंना दुखापत झाल्याने बांगलादेशला मोठा झटका बसला आहे. 

सरावादरम्यान झाली दुखापत 
बांगलादेशच्या संघाचा वेगवान गोलंदाज हसन महमूद (Hasan Mahmud) आणि अष्टपैलू खेळाडू महेदी हसन (Mahedi Hasan) आशिया चषकापूर्वी दुखापतग्रस्त झाले आहेत. शनिवारी सराव सुरू असताना दोघांना दुखापत झाली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे महमूदला मैदानातून बाहेर व्हावे लागले तर महेदी हसनच्या पायाला दुखापत झाली आहे. मिरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर बांगलादेशचा संघ आशिया चषक स्पर्धेसाठी सराव करत आहे. 

आशिया चषकात खेळण्यावरून संभ्रम
माहितीनुसार, महेदी हसनला सध्या सरावापासून लांब ठेवण्यात आले असून तो काही वेळ विश्रांती घेणार आहे. वेगवान गोलंदाजाच्या दुखापतीची अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. एमआरआय स्कॅननंतरच तो आशिया चषकात खेळेल की नाही हे स्पष्ट होईल. आधीच बांगलादेशचा महत्त्वाचा खेळाडू लिटन दास (Liton Das) संघाबाहेर झाल्याने बांगलादेशची डोकेदुखी वाढली होती, त्यामध्ये ही भर पडल्याने कर्णधार शाकिब अल हसनसमोर अडचणींचा डोंगर उभा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा करणारा लिटन दास बहुचर्चित स्पर्धेला मुकणार आहे. संघातील २ प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने बांगलादेशच्या संघ निवड समितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ - शाकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसद्देक हुसैन, महमुदुल्लाह रियाद, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नासुम अहमद, शब्बीर रहमान, महेदी हसन मिराज, महेदी हसन, इबादत हुसैन, परवेज हुसैन इमॉन, नुरूल हसन सोहन, तस्कीन अहमद. 

 

Web Title: hasan mahmud and Mahedi Hasan, 2 players of Bangladesh have been injured before the Asia Cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.