Mohammed Shami:"कोट्यवधी कमावणाऱ्याने मुलीला १०० रूपयाचा ड्रेस दिला", मोहम्मद शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:53 PM2022-08-14T12:53:20+5:302022-08-14T12:57:31+5:30

whatsapp join usJoin us
Hasin Jahan alleged that Mohammed Shami does not even talk to our daughter | Mohammed Shami:"कोट्यवधी कमावणाऱ्याने मुलीला १०० रूपयाचा ड्रेस दिला", मोहम्मद शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप

Mohammed Shami:"कोट्यवधी कमावणाऱ्याने मुलीला १०० रूपयाचा ड्रेस दिला", मोहम्मद शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) वैयक्तिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. शमीची पत्नी हसीन जहॉंने (Hasin Jahan) त्याच्यावर खटला देखील दाखल केला आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील वादाने कोर्टाची पायरी गाठली आहे. सध्या मोहम्मद शमी आपल्या घातक गोलंदाजीने जगभरातील दिग्गज गोलंदाजांना चितपट करत आहे. शमीने मोठे धाडस दाखवले आणि सर्व वाद आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार मागे टाकून आपल्या खेळीवर लक्ष केंद्रीत केले. या वादाकडे दुर्लक्ष करत शमीने स्वत:च्या बळावर अनेक सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त हसीन जहॉं
शमी आणि त्याची पत्नी जहॉं यांच्यातील वाद अद्याप संपलेला नाही. मात्र शमीने सातत्याने त्या वादाकडे दुर्लक्ष केले असून क्रिकेटवर भर दिला आहे. मात्र आता त्याच्या पत्नीने शमी आणि त्यांच्या मुलीबद्दल जे काही वक्तव्य केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. हसीन जहॉंने मुलीला निकृष्ट दर्जाचा ड्रेस दिल्याचा गंभीर आरोप शमीवर केला आहे. सध्या बांग्ला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या हसीन जहॉंने अलीकडेच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. शमीच्या नावाचा उल्लेख करताच तिने क्रिकेटपटूवर हा गंभीर आरोप केला. 

जहॉंने केला गंभीर आरोप
आता मुलगी मोठी होत आहे. ती शाळेत जाते, शाळेतील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. तिथे सर्वजण आपापल्या वडीलांसोबत कार्यक्रमांना हजेरी लावत असतात ते पाहून ती देखील शमीच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करते. मात्र शमी तिच्याशी बोलत नसून तिला कधीच कोणतीच गोष्ट गिफ्ट म्हणून देत नाही. याशिवाय आपल्या मुलीला ईदच्या दिवशीही कपडे पाठवत नाही. गेल्या महिन्यात मुलीने तिच्या वाढदिवशी प्रश्न विचारला असता तिने वडिलांना मेसेज करून गिफ्ट पाठवण्यास सांगितले होते, असे हसीन जहॉंने आरोप करताना म्हटले. 

निकृष्ट दर्जाचे कपडे पाठवले
हसीनने म्हटले की, मुलीच्या सांगण्यावरून शमीने गिफ्ट तर पाठवले मात्र फुटपाथवर ५०, १०० रुपयांना विकले जाणारे ड्रेस पाठवले आणि ते आकाराने देखील लहान होते. ते कपडे पाहून मला असे वाटले की कोट्यवधी रूपये कमावणारा क्रिकेटर स्वत:साठी एका दिवसात लाखो रूपयांची शॉपिंग करतो आणि आपल्या मुलीला एवढ्या निकृष्ट दर्जाचे कपडे कसे पाठवू शकतो. अशा शब्दांत हसीन जहॉंने शमीवर गंभीर आरोप केले आहेत. 

 


 

Web Title: Hasin Jahan alleged that Mohammed Shami does not even talk to our daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.