Join us  

राम मंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँनं केली पोस्ट; फॅन्सनी दिली जीवे मारण्याची धमकी

2018मध्ये हसीन जहाँनं भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 12:38 PM

Open in App

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो, कधी डान्स करतानाचे व्हिडीओ पोस्ट करून हसीन जहाँ चर्चेत राहते. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावरील तिच्या पोस्टही प्रचंड वाढलेल्या पाहायला मिळत आहे. आता ती आणखी एका पोस्टनं चर्चेत आली आहे. यावेळी तिनं राम मंदिर भूमिपूजनावरून पोस्ट केली आणि तिला काही नेटिझन्सनी जीवे मारण्याची धमकी दिली.

'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

2018मध्ये हसीन जहाँनं भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. शमी आणि त्याचे कुटुंबीय छळ करत असल्याचे आरोप करत तिनं पोलीस चौकीत तक्रारही दाखल केली होती. याव्यतिरिक्त तिनं शमीवर फिक्सिंगचे आणि अन्य मुलींसोबत संबंध असल्याचे आरोपही केले होते. फिक्सिंगच्या आरोपांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) चौकशी केली होती आणि त्याला निर्दोष मुक्त केले. हसीननं शमीच्या भावावरही बलात्काराचे आरोप केले.  

Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!

Fact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह? वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य

हसीन जहाँने पोस्ट केली की,''अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी समस्त हिंदू समाजाचे अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा...'' शुभेच्छा देताना तिनं अनेक इमोजी वापरल्या आणि त्या काहींना पसंत आल्या नाही.    

टॅग्स :राम मंदिरअयोध्यामोहम्मद शामी