भारतीय संघातील स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सद्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीमुळे चर्चेत आहे. खूप दिवसांनी लेकीची भेट झाल्यानंतर हा 'बाप-माणूस' खूप भावूक झाल्याचा सीन पाहायला मिळाला. क्रिकेटरनं लेकीसोबतचा खास व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असताना आता 'बाप-लेकी'च्या भेटीवर त्याची बायको हसीन जहाँ हिने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं (मोहम्मद शमी) जे केलं ते फक्त अन् फक्त दिखाव्यासाठी होते, असे ती म्हणाली आहे.
लेकीच्या भेटीनंतर भावूक झाला होता शमी
मोहम्मद शमीनं जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात तो लेकीसोबत शॉपिंग मॉलमध्ये दिसतोय. खास कॅप्शनसह त्याने लेकीसोबतच्या भावनिक क्षणचा व्हिडिओ शेअर केला होता. शमीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "खूप दिवसांनी लेकीला पुन्हा पाहिलं त्यावेळी सर्वकाही थांबलं होते. बेबोवरील प्रेम शब्दांत व्यक्त करू शकत नाही." त्याच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. पण हसीन जहाँला मात्र मोहम्मद शमीची पोस्ट चांगलीच झोंबलीये. तिने पुन्हा त्याच्यावर आरोपाच हत्यार उगारले आहे.
'बाप -लेकी'च्या भेटीसंदर्भात काय म्हणाली हसीन जहाँ?
Anandabazar वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हसीन जहाँनं यासंदर्भात तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणालीये की, लेकीचा पासपोर्टची मुदत संपली आहे. नुतनीकरणासाठी मोहम्मद शमीच्या स्वाक्षरीची आवश्यकता होती. त्यामुळेच ती वडिलांना भेटायला गेली होती. पण शमीनं स्वाक्षरी केलीच नाही. तो लेकीला घेऊन शॉपिंग मॉलमध्ये गेला. तिथंही त्यानं लेकीला हवं ते दिलं नाही, असा दावाही हसीन जहाँनं केला आहे.
फुकटात मिळाल तेच दिलं
मोहम्मद शमी ज्या कंपनीची जाहिरात करतो त्याच मॉलमध्ये तो लेकीला शॉपिंगसाठी घेऊन गेला होता. माझ्या मुलीनं तिथं कपडे आणि शूज खरेदी केले. इथं शमीला सगळं फुकटात मिळते. त्याला पैसे द्यावे लागत नाहीत. लेकीला गिटार आणि कॅमेरा हवा होता. पण शमीने ते तिला दिले नाही.
त्याला लेकीचं काही पडलेले नसते, तो त्याच्या विश्वात जगतो
मोहम्मद शमी कधीच लेकीची विचारपूस करत नाही. तो नेहमी आपल्या विश्वात जगतो. एक महिन्यापूर्वीही तो लेकीला भेटला होता. पण त्यावेळी त्याने कोणतीही पोस्ट केली नव्हती. पोस्ट करण्यासाठी त्याच्याकडे काहीच नसेल त्यामुळे त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला असेल, असा आरोपही हसीन जहाँनं शमीवर केला आहे.
बायको अन् मुलीच्या खर्चासाठी शमीला द्यावे लागतात लाखो रुपये
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यात कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोघे विभक्त राहत आहेत. कोर्टाच्या निर्णयानुसार, शमी हा हसीन जहाँला महिन्याला १ लाख ३० हजार रुपये द्यावे लागतात. यातील ८० हजार लेकीच्या संगोपनासाठी आणि ५० हजार ह