Join us  

हसरंगाने घेतली कोलकाताची फिरकी, आरसीबीचा दमदार मारा

फलंदाज कोलमडले ; आरसीबीचा दमदार मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:18 AM

Open in App

नवी मुंबई : सलामीला गतविजेत्या आणि बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जला नमवून दिमाखात सुरुवात केलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने  (आरसीबी) मर्यादित धावसंख्येत रोखले. वानिंदू हसरंगा, आकाश दीप आणि हर्षल पटेल यांनी भेदक मारा करत कोलकाताचा डाव २० षटकांत १२८ धावांवर संपुष्टात आणला.

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर नाणेफेक जिंकून आरसीबी कर्णधार फाफ डूप्लेसिसने कोलकाताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले.फिरकीपटू वानिंदू हसरंगाने कोलकाताच्या फलंदाजीला खिंडार पाडताना २० धावांत ४ बळी घेतले. त्याने नवव्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर सुनील नरेन आणि शेल्डन जॅक्सन यांना बाद करत कोलकाताला प्रचंड दबावात आणले. आकाशनेही ३ बळी घेत प्रभावी मारा केला. युवा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने त्याआधी आपला जलवा दाखवला. त्याने धोकादायक व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांना स्वस्तात बाद करत आरसीबीला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली. 

उमेश, वरुण लढले  प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्याने कोलकातावरील दडपण स्पष्ट दिसले. आरसीबीने कोलकाताची ९ षटकांत ६ बाद ६७ अशी अवस्था केली. सॅम बिलिंग्ज व हुकमी एक्का आंद्रे रसेल यांनी छोटेखानी आक्रमक खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हर्षल पटेलने दोघांना बाद करत कोलकाताला मोठा धक्का दिला. उमेश यादव व वरुण चक्रवर्ती यांनी अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबामुळे कोलकाताने समाधानकारक मजल मारली. 

खेळाडू               रहाणे झे. शाहबाज गो. सिराज    ०९    १०      १/०   ९०व्यंकटेश अय्यर झे. आणि गो. आकाश    १०    १४      १/०   ७१श्रेयस अय्यर झे. प्लेसिस गो. हसरंगा     १३    १०      २/०   १३०     नीतीश राणा झे. विली गो. आकाश     १०    ०५      १/१   २००नारायण झे. आकाश गो. हसरंगा     १२    ०८      १/१  १५०बिलिंंग्स झे. कोहली गो. पटेल     १४    १५      ०/१    ९३शेल्डन जॅक्सन त्रि. गो. हसरंगा     ००    ०१      ०/०   ०००रसेल झे. कार्तिक गो.पटेल     २५    १८     १/३    १३८टिम साऊदी झे. प्लेसिस गो. हसरंगा     ०१    ०५      ०/०    २०उमेश यादव त्रि. गो. आकाशदीप     १८    १२     २/०   १५०चक्रवर्ती नाबाद     १०    १६      २/०   ६२

गोलंदाज    षटक    डॉट    धावा     बळी     मेडनविले      २    ०६     ०७     ०    ०सिराज      ४    १३       २५     १    ०आकाशदीप     ३.५    १०     ४५     ३    ०    हसरंगा      ४    १५     २०     ४    ०हर्षल          ४    १९     ११     २     ०शाहबाज      १    ०२     १६     ०    ०    

 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App