Join us  

भारतीय गोलंदाजाची दक्षिण आफ्रिकेत हॅटट्रिक अन् ५ विकेट्स; रचला इतिहास 

India A vs South Africa A - भारताचा एक संघ दक्षिण आफ्रिकेत ट्वेंटी-२० मालिका खेळतोय, तर त्याचवेळी युवा खेळाडूंचा एक संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामना गाजवतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 4:03 PM

Open in App

India A vs South Africa A - भारताचा एक संघ दक्षिण आफ्रिकेत ट्वेंटी-२० मालिका खेळतोय, तर त्याचवेळी युवा खेळाडूंचा एक संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामना गाजवतोय... प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव ३१९ धावांवर गुंडाळल्यानंतर भारत अ संघाने दमदार सुरुवात केली आहे. पण, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna ) याने विक्रमी कामगिरी केली. त्याने हॅटट्रिक घेतली आणि नावावर ५ बळी नोंदवून इतिहास रचला.

दक्षिण आफ्रिका अ संघाच्या जीन ड्यू प्लेसिसचे शतक अन् रुबीन हर्मनच्या ९५ धावांच्या खेळीने भारतीय गोलंदाजांना हैराण केले. आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर सौरव कुमार व विद्वांत कावेरप्पा यांनी माघारी पाठवले. पण, ड्यू प्लेसिस व हर्मन यांनी चांगली फटकेबाजी केली. हर्मनने १४६ चेंडूंत ९५ धावा केल्या. कर्णधार ब्रूस पार्सेन २४, कोन्नोर एस्टेर्ह्यूजेन ४८ धावांवर माघारी परतला. ड्यू प्लेसिसने २१३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह १०६ धावांची खेळी केली. त्याची विकेट कृष्णाणेच घेतली. भारतीय गोलंदाजाने आफ्रिका अ संघाच्या शेवटच्या ४ फलंदाजांना माघारी पाठवले.

त्याने ९४.५ षटकांत ड्यू प्लेसिसला बाद केले. पुढच्या चेंडूवर ईथन बॉशला माघारी पाठवले. ९६.५ व ९६.६ षटकांत प्रसिद्ध कृष्णाने अनुक्रमे कर्टीन मन्निकम व सिया प्लात्झे यांना बाद केले. ९८.१ षटकात त्याने ऑडिरील मोडीमोकोनची विकेट घेऊन हॅटट्रिक पूर्ण केली आणि आफ्रिकेचा डाव ९८.१ षटकांत ३१९ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात भारताने २० षटकांत २ बाद १०९ धावा केल्या आहेत. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे आणि दक्षिण आफ्रिकेत असा पराक्रम करणारा पहिला. यापूर्वी सी. के. नायुडू ( वि. सरे, ओव्हल, १९४५), सीआऱ रंगाचारी ( वि. तस्मेनिया, होबर्ट, १९४८), रमेश दिवेचा ( वि. सरे, ओव्हल, १९५२), इरफान पठान ( वि. पाकिस्तान, कराची, २००६), जसप्रीत बुमराह ( वि. वेस्ट इंडिज, किंग्स्टन, २०१९) यांनी असा पराक्रम केला आहे. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ