नवी दिल्ली : खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच चर्चेत असतात त्या त्यांच्या हेअरस्टाईल. भारताचा माजी कर्णधार महेंदसिंग धोनी त्याच्या फटकेबाजीबरोबरच हेअरस्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. इंग्लंडवरून भारतात परतल्यावर धोनीने नवीन हेअरस्टाईल केली आहे.
धोनीच्या लांबसडक केसांचे बरेच फॅन होते. त्याचनंतर बऱ्याचदा धोनीने आपली हेअरस्टाईल बदलली आणि चाहत्यांच्या ती पसंतीस पडली. सध्याच्या घडीला भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. पण धोनी मात्र कसोटी संघात नसल्याने तो भारतात परतला आहे. भारतात परतल्यावर धोनीने बॉलीवूड सेलिब्रेटींबरोबर फुटबॉलचा सामना खेळला होता. त्यानंतर मात्र धोनीने आपली नवीन हेअरस्टाईल केली आहे.
धोनीच्या नव्या हेअरस्टाईलला 'वि हॉक' लूक म्हटले जाते. ही नवीन हेअरस्टाईल केल्यावर धोनीने आपले दोन फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहेत आणि धोनीची नवीन हेअरस्टाईल चाहत्यांना चांगलीच पसंत ठरली आहे.