भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग लवकरच बाप बनणार आहे आणि त्यानंतर तो क्रिकेट प्रशिक्षण किंवा कॉमेंट्री करण्याचा विचार सुरू आहे. युवीनं इंस्टाग्राम लाईव्हमध्ये इंग्लंडचा फलंदाज केव्हीन पीटरसन याच्याशी गप्पा मारताना हा खुलासा केला. लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे आणि लवकरच बाप बनणार असल्याचे त्यानं सांगितलं. युवीनं 2016मध्ये बॉलिवूड अभिनेत्री हेझल किच हिच्याशी लग्न केलं.
पीटरसननं युवीला कॉमेंट्रीबाबत प्रश्न विचारला होता. तो म्हणाला,''क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर काम करण्याचा विचार करत आहे. कॉमेंट्री करण्यापेक्षा मला प्रशिक्षक व्हायला आवडेल.सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे आणि अधिक काळ पार्कमध्ये कसरत करत आहे. आशा करतो की लवकच मी बाप बनेन आणि त्यानंतर मी प्रशिक्षकाच्या क्षेत्रात पाऊल ठेवेन.''
यावेळी युवीनं 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा एक किस्सा सांगितला. भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून हा वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडिवरुद्धच्या एका सामन्यात युवीनं सहा चेंडूंत सहा षटकार खेचले होते. याच सामन्यात युवीनं ट्वेंटी-20 स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतकाचा पराक्रम केला होता. या सामन्यातील एक किस्सा युवीनं यावेळी सांगितला,''इंग्लंडच्या अँण्ड्य्रु फ्लिंटॉफनं मला सामन्यात जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा मीही त्याला हातातली बॅट पाहिलीस का, असे उत्तर दिले आहेत. तेव्हा मीही खूप रागात होतो.''
युवीनं भारताकडून 304 वन डे, 58 ट्वेंटी-20 आणि 40 कसोटी सामने खेळले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला
22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं
सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत
भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली